Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक

नेरळजवळील अचानक नगर परिसरात बिल्डरने केलेल्या मातीच्या भरावामुळे नैसर्गिक नाल्याचा मार्ग बंद झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पावसाळा तोंडावर असताना घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 30, 2026 | 02:02 PM
Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक

Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:
  • अलायन्स ग्रुपने केलेल्या मातीच्या भरावामुळे नैसर्गिक नाल्याचा मार्ग बंद झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
  • नाल्याचा निचरा बंद झाल्यास पहिल्याच पावसात अचानक नगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
  • प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कर्जत: नेरळ गावच्या हद्दीवर असलेल्या ममदापूर ग्रामपंचायतमधील खांडा भागातील अचानक नगरमधील रहिवाशी पावसाळा सुरू होण्याआधीच घाबरले आहे. तेथे जमीन विकासक बिल्डरने आजुबाजूच्या लोकांचा कोणताही विचार न करता मातीचा भराव आपल्या जमिनीमध्ये केला आहे. त्याचा परिणाम तेथून पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाला बंद होणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी तेथेच अडकून पडणार असून पावसाळ्यातील पहिल्याच दिवशी तेथील अनेकांच्या घरात पाणी शिरणार आहे. दरम्यान, अलायन्स ग्रुप या बांधकाम व्यावसायिक विरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग; अर्थ किंवा महसूल खात्यासाठी वळसे पाटील यांचे नाव चर्चेत

स्थानिक ग्रामस्थ आक्रमक

कर्जत-नेरळ कल्याण या राज्यमार्ग रस्त्याने येणारा नाला ममदापूर ग्रामपंचायतमधील खांडा भागातून जातो. येथील नैसर्गिक नाला ‘अलायन्स ग्रुप’ या कंपनीच्या बिल्डरकडून आपल्या जमिनीत केलेल्या मातीच्या भरावामुळे बंद झाला आहे. संबंधित बिल्डरने गृहप्रकल्पाच्या बांधकामासाठी केलेल्या मातीच्या भरावाचा परिणाम होऊन त्या भागात राहणारे स्थानिक लोकांच्या दारातून जाणारा नाला बंद होणार आहे. या मनमानी कारभारामुळे आगामी पावसाळ्यात नेरल खांडा येथील अचानक नगरमधील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व जीवितहानी होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येच्या विरोधात येथील स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

नैसर्गिक गटांरातून वाहून जाणारे पाणी जाण्यासाठी बिल्डरने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. यामुळे पहिल्याच पावसात डोंगर आणि उंचावरून येणारे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरून घरांचे अतोनात नुकसान होऊ शकते, अशी तीव्र भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. या बिल्डरच्या दादागिरीविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत निवेदनातून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

Mumbai News: कांजूर डम्पिंग; विषारी विळखा! पालिकेच्या निष्क्रियतेबाबत नाराजी; जागतिक प्रदूषणात १२ व्या स्थानावर

तर संतप्त नागरिक तीव्र आंदोलन छेडतील

या संदर्भात अचानक नगर येथील रहिवाशी यांनी एकत्र येत आवाज उठवला आहे. ग्रामस्थांनी कर्जत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी आणि नेरळ विकास प्राधिकरण यांच्याकडे पत्राद्वारे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. काही दिवसांवर आलेले पावसाळ्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हा नाला पूर्ववत केला नाही किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी सक्षम पर्यायी व्यवस्था करून दिली नाही, तर नेरळ खाडा येथील अचानक नगरमधील सर्व नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व संबंधित बिल्डरवर असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Residents fear flooding as natural drain gets blocked by land filling in karjat neral area raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

RATNAGIRI : आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवींचा विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज
1

RATNAGIRI : आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवींचा विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज

अरे वाह! …मग स्वस्त होणार Cylinder! होर्मुझमधील नाकाबंदी उठवली तर भारताचं टेन्शन संपणार?
2

अरे वाह! …मग स्वस्त होणार Cylinder! होर्मुझमधील नाकाबंदी उठवली तर भारताचं टेन्शन संपणार?

तब्बल 35000 कोटींची Mega Investment; Rashmi Group करणार स्टील, खाणकाम आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक
3

तब्बल 35000 कोटींची Mega Investment; Rashmi Group करणार स्टील, खाणकाम आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक

अनिल अंबानींना मोठा धक्का! Bank Fraud प्रकरणात CBI कडून पहिली चार्जशीट दाखल, रिलायन्स कंपनीविरोधात आता…
4

अनिल अंबानींना मोठा धक्का! Bank Fraud प्रकरणात CBI कडून पहिली चार्जशीट दाखल, रिलायन्स कंपनीविरोधात आता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.