Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : ‘आमची घरं, आमचं जंगल आम्ही सोडणार नाही’; टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका

कर्जत तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीअंतर्गत प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पाला मल्टीवाडीतील आदिवासी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तीन-चार पिढ्यांपासून साई डोंगर परिसरात वास्तव्यास असलेल्या पाच कुटुंबांनी कोणत्याही परिस्थितीत गाव सोडणार नसल्याची भूमिका घेतली. योग्य मोबदला मिळेपर्यंत जागा खाली करणार नसल्याचा इशारा दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2026 | 12:26 PM
'आमची घरं, आमचं जंगल आम्ही सोडणार नाही'; टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका

'आमची घरं, आमचं जंगल आम्ही सोडणार नाही'; टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका

Follow Us
Follow Us:
  • टोरंट पॉवर प्रोजेक्ट साठी आम्ही गाव सोडून जाणार नाही
  • मल्टी वाडी मधील ग्रामस्थांची आर्त हाक
  • टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका
कर्जत : कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत मध्ये होत असलेल्या प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी आम्ही आमचे गाव सोडून जाणार नाही, अशी आर्त हाक मल्टीवाडी मधील ग्रामस्थांची आहे. आमची पाच कुटुंब या ठिकाणी राहत असून आता धरण होणार म्हणून आमची घरदारे सोडून जायचे काय? असा सवाल येथील रहिवाशी शिवाजी शंकर पवार यांनी उपस्थित केला आहे. टोरंट कंपनी आम्हाला बळजबरीने घराबाहेर काढू शकत नाहीत अशी भूमिका येथील आदिवासी ग्रामस्थांनी घेतली आहे.

Karjat News : टोरंट कंपनीचा प्रताप! जलविद्युत प्रकल्पासाठी नियम

टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन लिमिटेड ही कंपनी पाली ग्रामपंचायत मधील साई डोंगर परिसरात धरण बांधणार आहे.त्या ठिकाणी दळी जमिनीवर राहत असलेल्या आदिवासी लोकांच्या मनात घरे आणि गाव सोडून जावे लागेल अशी भीती घातली गेली आहे. साई डोंगर मधील जंगलात तीन चार पिढ्या राहणाऱ्या मल्टी वाडी मधील पाच कुटुंब आता आपला निवारा वाचवण्यासाठी सरसावले आहेत. तेथील जंगलात रानमेवा गोळा करून आपले कुटुंब चालवणाऱ्या तेथील सर्व कुटुंबांच्या मनात गाव सोडून जावे लागेल अशी टोरंट कडून येणारे एजंट कडून सांगण्यात येत आहे. याबाबत 70 वर्षीय शिवाजी शंकर पवार यांचे कुटुंब या जागेमध्ये गेली 40 वर्षांपासुन राहात आहोत.

पुर्वी या जागेमध्ये आमचे एकच कुटूंब वस्तव्य करत होते. आता या ठिकाणी पाच कुटूंब राहात आहेत.या जंगला मध्ये असणारा राण मेवा,मासे, खेकडे तसेच या जंगलामध्ये असणारे अनेक वन्य प्राणी यांच्याशी आमचा संबंध येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबट्या वाघ अशाप्रकारे प्राणी आपल्याला पाहायला मिळत असतात हे सर्व प्राणी आमच्या घराच्या आजूबाजूला फिरत असतात मात्र हे सर्व प्राणी आता या टोरेंट प्रोजेक्टमुळे नाहीसे होणार असल्याने व त्या ठिकाणी आम्ही वस्ती करून राहत आहोत या जागेचा तोपर्यंत आम्हाला मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून वाटणार नाही अशी प्रतिक्रिया येथील आदिवासी लोक करत आहेत.

येथील स्थानिक धनगर लोक आणि आम्हाला येथेच राहायचे असून आमची आता बाहेर जाऊन राहण्याची आर्थिक स्थिती नाही.आमच्या आजुबाजूला आम्हाला अनेक प्राणी दिसतात आणि येथून निघाल्यावर त्या प्राण्यांचा सहवास नाहीसा होणार आहे.आमच्या दारातून बिबट्या अनेकदा गेलेला आहे,तरी आम्हाला त्याची भीती वाटत नाही.कारण त्या बिबट्या तसेच अन्य प्राण्यांना आम्ही आपले शेजारी वाटतो.आमच्या कडून त्या प्राण्यांना काही धोका नसल्याने मल्टी वाडी मधील ग्रामस्थ येथे आपले राहिलेले जीवन व्यतित करण्याचा निर्णयांवर ठाम आहेत.पवार यांनी आपल्या वाडी बद्दल बोलताना आम्ही तुमच्या जागेमध्ये राहत होते याला मल्टी वाडी असे म्हणतात.मात्र या जागेचा नाव मल्टी असे पडले ही देखील एक कथा आहे. बाजूने वाहणारे पेज नदी वाहते मात्र याच ठिकाणी मल्टी असे नाव या जागेला पडले असून ही पेज नदी आमची माता आहे.

ज्यावेळी पावसाळा सुरू होतो त्यावेळी याच पेज नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येतो व हे पाणी आमच्या घराच्या दारापर्यंत येतो.तरी देखील आम्हाला भीती वाटत नाही याचे कारण आम्ही पाण्याचे शत्रू नाहीत.कधीकधी येथील ग्रंथांना आठ ते नऊ दिवस घरामध्ये बसून राहावे लागते हे सर्व संकटाला सामोरे जाऊन आम्ही या ठिकाणी राहत आहोत.पण त्यामुळे आम्हाला ही वाडी सोडून टोरेंट कंपनी साठी गाव सोडायचे नाही.आमचे या निसर्गाची नळ जोडल्याने आम्ही या निसर्गात राहत आहे.या निसर्गामध्ये नाव कुठले भांडणांना कुठले दंडा आम्ही हे जीवन आनंदाने जगत आहोत मात्र आम्हाला या ठिकाणी उठवले नाही तर आम्ही या ठिकाणी आनंदाने आयुष्यभर राहू पण येथून कुठेही राहायला जाणार नाही असा ठाम निर्धार मल्टी वाडी मधील ग्रामस्थ यांनी केला आहे.

‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा …

Web Title: Tribal villagers oppose torrent hydropower project in karjat multiwadi residents refuse to leave village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
2

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.