Raigad News: किल्ले रायगडावर पाण्याचा तुटवडा; ऐतिहासिक कामे ठप्प होण्याच्या मार्गावर
Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळीचा गळा आवळतोय? पुणे जिल्ह्यातील केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट
इतिहास अभ्यासक, दुर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून या प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. रायगड हा महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असल्याने त्याच्या संवर्धनात कोणताही अडथळा येऊ नये, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. पुढील काही दिवसात विद्यार्थ्यांच्या परीक्षा समाप्तीनंतर गडावरील पर्यटकांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मात्र, सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामुळे गडावरील गंगासागर तलावासह अनेक पाणवठे आणि टाक्यांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. परिणामी, कामांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. ठेकेदारांना नियोजित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करण्यात अडचणी येत असून, काही ठिकाणी कामे थांबवण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजी राजे यांनी मागील आठवड्यात महाड भेटीदरम्यान या परिस्थितीची गंभीर दखल घेतली होती. संवर्धन आणि डागडुजी कामांदरम्यान पाण्याची कमतरता भासत असल्याची तक्रार ठेकेदारांकडून मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले, यानंतर त्यांनी स्वतः रायगडावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रश्नावर राज्यस्तरावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रायगडावरील पाणीटंचाईच्या प्रश्नावर स्वतंत्र विशेष बैठक घेण्याबाबत। त्यांनी संकेत दिले असून, लवकरच याबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पर्याय वापरला जात असला, तरी गडाचा उंच व दुर्गम भूभाग लक्षात घेता हा उपाय अत्यंत खर्चिक आणि मर्यादित ठरत आहे. वाहतुकीच्या अडचणीमुळे वेळेवर पाणी पोहोचवणेही कठीण बनले आहे, त्यामुळे दीर्घकालीन उपाय म्हणून पावसाळ्यातील पाणी, साठवण क्षमता वाढवणे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगसारख्या शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल
मात्र या गडावरील या पाणीटंचाईमुळे येणाऱ्या पर्यटकांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासल्याने त्याचा परिणाम पर्यटनावर होण्याची देखील चिन्ह देखील दिसून येत आहेत. एकंदरीत, पाणीटंचाई ही किल्ले रायगड समोरील मोठे आव्हान ठरत असून, यावर तातडीने प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना केल्यासच संवर्धन कामांना अपेक्षित गती मिळू शकणार आहे. अन्यथा, ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या प्रक्रियेला विलंब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






