Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: किल्ले रायगडावर पाण्याचा तुटवडा; ऐतिहासिक कामे ठप्प होण्याच्या मार्गावर

महाराष्ट्रातील ऐतिहासिक रायगडावर वाढत्या पाणीटंचाईमुळे संवर्धन कामांवर परिणाम होत आहे. जलस्रोत आटत चालल्याने कामांचा वेग मंदावला असून, प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2026 | 02:19 PM
Raigad News: किल्ले रायगडावर पाण्याचा तुटवडा; ऐतिहासिक कामे ठप्प होण्याच्या मार्गावर

Raigad News: किल्ले रायगडावर पाण्याचा तुटवडा; ऐतिहासिक कामे ठप्प होण्याच्या मार्गावर

Follow Us
Follow Us:
  • किल्ले रायगडावर वाढत्या पाणीटंचाईमुळे संवर्धन आणि डागडुजी कामांचा वेग मंदावला आहे.
  • गंगासागर तलावासह जलस्रोत आटत असल्याने कामांसाठी आवश्यक पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
  • रेनवॉटर हार्वेस्टिंगसारख्या दीर्घकालीन उपाययोजनांची तातडीची गरज व्यक्त केली जात आहे.
महाड: ऐतिहासिक किल्ले रायगडावर वाढत्या पाणीटंचाईमुळे सुरू असलेल्या संवर्धन आणि डागडुजी कामांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गडावरील नैसर्गिक जलस्रोत आटत चालल्याने प्राधिकरणासमोरील अडचणी वाढत असून, अनेक कामांचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व लक्षात घेता शासनाकडून गेल्या आठ वर्षांपासून तटबंदी, बुरुज, दरवाजे आणि राजवाड्याच्या अवशेषांचे जतन व पुनर्बाधणीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या कामांमध्ये पारंपरिक बांधकाम पद्धतींचा वापर होत असल्याने चुन्याचे मिश्रण, दगडी बांधकाम मजबूत करणे तसेच स्वच्छता आणि देखभाल यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासते.

Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळीचा गळा आवळतोय? पुणे जिल्ह्यातील केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट

इतिहास अभ्यासक, दुर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून या प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. रायगड हा महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असल्याने त्याच्या संवर्धनात कोणताही अडथळा येऊ नये, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. पुढील काही दिवसात विद्यार्थ्यांच्या परीक्षा समाप्तीनंतर गडावरील पर्यटकांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

तीव्र उन्हाळ्यामुळे पाणीसाठ्यात होते झपाट्याने घट

मात्र, सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामुळे गडावरील गंगासागर तलावासह अनेक पाणवठे आणि टाक्यांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. परिणामी, कामांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. ठेकेदारांना नियोजित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करण्यात अडचणी येत असून, काही ठिकाणी कामे थांबवण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजी राजे यांनी मागील आठवड्यात महाड भेटीदरम्यान या परिस्थितीची गंभीर दखल घेतली होती. संवर्धन आणि डागडुजी कामांदरम्यान पाण्याची कमतरता भासत असल्याची तक्रार ठेकेदारांकडून मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले, यानंतर त्यांनी स्वतः रायगडावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रश्नावर राज्यस्तरावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

रेनवॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांची गरज

रायगडावरील पाणीटंचाईच्या प्रश्नावर स्वतंत्र विशेष बैठक घेण्याबाबत। त्यांनी संकेत दिले असून, लवकरच याबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पर्याय वापरला जात असला, तरी गडाचा उंच व दुर्गम भूभाग लक्षात घेता हा उपाय अत्यंत खर्चिक आणि मर्यादित ठरत आहे. वाहतुकीच्या अडचणीमुळे वेळेवर पाणी पोहोचवणेही कठीण बनले आहे, त्यामुळे दीर्घकालीन उपाय म्हणून पावसाळ्यातील पाणी, साठवण क्षमता वाढवणे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगसारख्या शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल

किल्ले रायगड समोरील पाणीटंचाईचे मोठे आव्हान

मात्र या गडावरील या पाणीटंचाईमुळे येणाऱ्या पर्यटकांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासल्याने त्याचा परिणाम पर्यटनावर होण्याची देखील चिन्ह देखील दिसून येत आहेत. एकंदरीत, पाणीटंचाई ही किल्ले रायगड समोरील मोठे आव्हान ठरत असून, यावर तातडीने प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना केल्यासच संवर्धन कामांना अपेक्षित गती मिळू शकणार आहे. अन्यथा, ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या प्रक्रियेला विलंब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Water crisis hits raigad fort conservation work slows down amid shortage raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’
1

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!
2

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट
3

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
4

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.