माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
४ सप्टेंबर रोजी अंबरनाथ येथील गौतम सोनू जनकराम गौतम हा२१ वर्षीय तरुण आपल्या मित्रासह माथेरान .येथे पर्यटनासाठी आला होता.नासीर मित्रासोबत माथेरान येथील अलेक्झांडर पॉईंट येथे गेले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोनू गौतम याने तेथील खोल दरीत उडी घेतली. त्यावेळी असलेले धुके यामुळे गौतम यांची काहीही माहिती मिळत नसल्याने नासिर खान या मित्राने माथेरान पोलिसांना त्याबाबाबत माहिती दिली.माथेरान पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सरिता मुसळे यांनी सह्याद्री रेस्क्यू टीम यांना पाचारण करून घेतले.त्यानंतर अंधार पडला होता आणि माथेरान डोंगर रांगेत धुक्याची दुलई पसरल्याने पोलिसांना त्या तरुणाचा शोध घेणे कठीण जात होते. रेस्क्यू टीम यांनी प्रयत्नांची शर्थ करीत १५०० फूट खोल दरीत काळाकुट्ट अंधारात मोहीम यशस्वी केली.
Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
या दुर्घटनेत सोनू गौतम याच्या डोक्याला, हाताला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणाची नोंद माथेरान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.याबाबत गुन्हा दाखल झाला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून बी जे रुग्णालयात शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईक यांच्या हाती देण्यात आला.
लुझा पॉईंट दुर्घटना: माथेरान येथील प्रसिद्ध लुझा पॉईंट (Louisa Point) जवळील एका दरीत ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास केला होता.
पर्यटकांच्या सुरक्षेबाबत आवाहन: माथेरान आणि त्याच्या आजूबाजूच्या गड-किल्ल्यांवर (जसे की पेब किल्ला) ट्रेकिंगसाठी किंवा फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा पाय घसरून दरीत पडण्याच्या दुर्घटना अनेकदा घडतात. त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांना धोकादायक कड्यांवर, पॉईंट्सवर सेल्फी किंवा रील्स न काढण्याचे सातत्याने आवाहन केले जाते .
Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल






