मुंबईसह कोकण पश्चिम महाराष्ट्रात विशाल पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) व्यक्त केली होती. त्यानंतर काही पावसाने उसंत घेतली. काल सायंकाळपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. रायगड (Raigad), रत्नागिरी (Rantnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik) आणि गडचिरोलीला (Gadchiroli) आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
[read_also content=”गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस, मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यानी पूरस्थितीची केली पाहणी! https://www.navarashtra.com/maharashtra/heavy-rainfall-in-gadchiroli-cm-and-deputy-cm-visited-the-city-nrps-303220.html”]
मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात 12 आणि 13 तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील 48 तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली. काल पावसाचा जोर कमी झाला आहे.