दौंडमध्ये १८ हजार कोंबड्या दगावल्या (फोटो- टीम नवराष्ट्र)
दौंड: तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा शेतकरी छोटे मोठे व्यवसायिक यांना बसू लागला आहे. तालुक्यातील हातवळण येथील युवा शेतकरी शुभम गोगवले यांनी कर्ज काढून शेतीला जोड असा लघुउद्योग म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. ह्या पोल्ट्रीमध्ये विविध जातींच्या कोंबड्यांचे पक्ष्यांचे पालन पोषण केले.
एक वर्षांपूर्वी सुरू केलेला हा व्यवसाय कसाबसा सावरला होता. मात्र सोमवारी (दि २६) सायंकाळी चार वाजण्याच्या आसपास अवकाळी पावसाने क्षणातच युवा व्यवसाय शुभमचे स्वप्न संपवले. या अवकाळी वादळी पावसात पोल्ट्री चे शेड जमीन दोस्त झाले. हे शेड कोंबड्यांच्या अंगावर पडल्याने तब्बल १८ हजार कोंबड्या दगावल्या असुन कोट्यावधी रुपयांचा आर्थिक नुकसान ही झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शुभम गोगावले यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे वरवंड चे मंडल अधिकारी नितीन मक्तेदार , गाव कामगार तलाठी नीलम बोकडे , ग्राम विकास अधिकारी प्रज्ञा चव्हाण, सरपंच रमेश जगताप, पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खताळ आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर नुकसानग्रस्त घटनेचा पंचनामा केला आहे.
जूनमध्ये हाहाकार माजणार! मान्सून आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार
यंदा जून महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. सरासरीच्या 108 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सून मे महिन्यातच दाखल झाला असून १६ वर्षांनंतर अशी परिस्थिती उद्भवली आहे. २०२४ मध्ये भारतात ९३४.८ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर २०२३ मध्ये तो ८२० मिमी पाऊस झाला होता. हा पाऊस सरासरीपेक्षा ९४.४ टक्के अधिक झाला होता.
संपूर्ण मान्सून हंगामात, देशात ८७ सेंटीमीटरच्या दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडू शकतो. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन म्हणाले की, या हंगामात मान्सूनच्या गाभा क्षेत्रात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे (दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्क्यांहून अधिक). मान्सूनच्या गाभा क्षेत्रात मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि लगतच्या प्रदेशांचा समावेश आहे. या प्रदेशात बहुतेक पाऊस नैऋत्य मान्सून दरम्यान पडतो आणि शेतीसाठी त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. वायव्य भारतात सामान्य पाऊस अपेक्षित आहे, तर ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, मध्य आणि दक्षिण भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी सांगितले की नैऋत्य मान्सून सामान्य तारखेच्या 16 दिवस आधी मुंबईत पोहोचला आहे. १९५० नंतर पहिल्यांदाच इतक्या लवकर दाखल झाला आहे. शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाला, २००९ नंतर पहिल्यांदाच तो भारतीय मुख्य भूमीवर इतक्या लवकर दाखल झाला. त्याच वर्षी २३ मे रोजी तो या राज्यात पोहोचला.