कल्याण/डोंबिवली : डोंबिवलीतील शिंदे गटातील एक मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो म्हणून डोंबिवलीतील फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही. पोलिसांनी पुरावा मागितला. तर आम्ही पुरावे देऊ, असा गौप्यस्फोट मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. तर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत हायकोर्टाकडून केडीएमसी आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
कंट्रोल रुममधून बसून पैसे गोळा करण्याचे काम
खड्ड्यांमुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर जे दोन अॅडव्होकेट रस्त्याची पाहणी करण्यासाठी येणार आहे. मला बोलविले तर त्यांना मी खरी परिस्थिती सांगणार. इतकेच नाही तर कल्याण शीळ रस्त्यावर गर्डर टाकण्याचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे. त्याठिकाणी बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश आहे. मात्र, केडीएमसी आयुक्त कारवाई करीत नाही. कंट्रोल रुममधून बसून पैसे गोळा करण्याचे सांगण्यात आले असल्याचा गंभीर आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.
महापालिकेत सध्या आरोप प्रत्यारोपाचे राजकारण
कल्याण डाेंबिवली महापालिकेत सध्या आरोप प्रत्यारोपाचे राजकारण जोरात सुरू आहे. समस्या मात्र काही सुटत नाही. रस्त्यावरील खड्डे डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हे ज्वलंत प्रश्न आहे. या प्रश्नांबाबत मनसेकडून नेहमी आवाज उठविला जातो. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून या समस्यांची दखल घेतली जात नाही, असा आरोप मनसेकडून केला जात आहे.
फेरीवाल्यांंच्या समस्येमुळे डोंबिवलीकरांना त्रास
डोंबिलीतील स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांंच्या समस्येमुळे डोंबिवलीकरांना नाहक त्रास होतो. हे फेरीवाले गुंडगिरी करून नागरिकांना मारहाण करतात. मनसेने त्या विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर एक महिना फेरीवाले स्टेशन परिसरातून गायब होते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. डोंबिवलीतील नामवंत लोकांच्या फोटोची विटंबना फेरीवाल्यांकडून केली जात असल्याचे दिसून आले. यावर काही नेत्यांनी टीका टिप्पणी केली.
डोंबिवलीचे वाटोळे केले
याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. ही शरमेची बाब आहे. डोंबिवलीतील नामांकीत लोकांचा फोटो काढून ज्यांनी डोंबिवलीचे वाटोळे केले. त्यांचे फाेटो त्याठिकाणी लावले पााहिजे, अशी टीका सत्ताधाऱ्यांवर केली आहे. शिंदे गटातील एक मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो त्यामुळे समस्या सुटत नाही.
लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्तब्य बजावले पाहिजे आणि प्रशासनाकडून कामे करून घेतले पाहिजे एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा जनतेची कामे कशी मार्गी लागतील हे त्यांनी पहावे असा सल्ला शिंदे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी राजू पाटलांना दिला आहे. – मनसे नेते तथा आमदार राजू पाटील