कल्याण/डोंबिवली : आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व मनसे नेते अभिजीत पानसे यांनी एकमेकांचे भेट घेतली यावेळी मनसे ठाकरे गट युतीबद्दल चर्चा रंगू लागली होती याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केले. मनसे आमदार राजू पाटील यांनी युती होईल, असे मला वाटत नाही. मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची पण इच्छा असली पाहिजे. समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, असा टोला नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.
अडचणीत असल्यावर आम्ही का युती करावी
पुढे बोलताना माझी अजिबात इच्छा नाही फक्त ते अडचणीत असल्यावर आम्ही का युती करावी, आमचे राज ठाकरे अडचणीत असताना घरी कौटुंबिक प्रसंग घडला असताना तुम्ही आमचे नगरसेवक फोडले आता तुमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? असा सवाल करीत आम्ही आतापर्यंत कोणाशी युती केली नाही यापुढे करू नये, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे आमदार पाटील स्पष्ट केले आहे.
आजच्या राजकीय परिस्थितीसाठी उद्धव ठाकरे जबाबदार
सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या फोडाफोडीबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी या त्यांच्या पक्षाअंतर्गत बाबी आहेत. त्याबद्दल आम्हाला माहित नाही. मात्र, या गोष्टीची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्यापासून झाली. जनतेला दिलेला कौल मान्य करून हिश्श्यासाठी भांडले नसते तर या गोष्टीसुद्धा घडल्या नसत्या त्यामुळे एकट्या देवेंद्रजी फडणवीस यांना दोष देऊन उपयोग नाही. लोकांनी जो कौल दिला होता त्याविरोधात हे सर्व घडले आहे. त्यामुळे हे घडले त्यांच्यासोबत आणि भोगते जनता, असे टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.
Web Title: Raju patils attack on uddhav thackeray said former fears polarization of votes more than a thackeray group mns alliance mns mla nryb