सांगली : गेल्या वर्षीच्या हंगामातील उर्वरित ४०० रुपये आधी द्या, मगच नव्या हंगामाला सुरुवात करा, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला, आज शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यासाठी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जनाक्रोश पदयात्रेला सुरुवात झाली, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी सावकार मदनाईक, पोपट मोरे, संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव आदीसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, आम्ही ४०० रुपयांचा हिशोब शासनाला दिलेला आहे, मात्र राज्य शासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे आता आम्ही ठरवलं आहे, ४०० रुपये दिले तरच कारखाने सुरू करू देणार, अशी आमची भूमिका आहे. मी स्वतः कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यावर पदयात्रा काढणार आहे, त्याची पदयात्रा क्रांती कारखान्यावर एक नोव्हेंबर रोजी येणार आहे. दोन्ही पद यात्राचा मिलाफ क्रांती कारखान्यावर होणार आहे, दोन्ही पदयात्रा हुतात्मा वसंतदादा कारखाना मार्गे सर्वोदय कारखान्यांवरून पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत.
खराडे म्हणाले, उसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्या वाढीव खर्चानुसार यंदाचा ऊस दर पदरात पाडून घेणे, वजन काटे ऑनलाईन करणे, तोडायला द्यावे लागणारे पैसे बंद करणे, साखर उताऱ्यातील चोरी थांबविणे, द्राक्ष बेदाणा महामंडळ स्थापन करावे, खप वाढविण्यासाठी जाहिरात सुरू करावी, दलालाची नोंदणी सुरू करावी, त्याच्याकडून डिपॉझिट घ्यावे, दुधाला हमी भाव लागू करावा, चालू दर कमी केला आहे. तो ३४ रुपये करावा, डाळिंब आणि द्रक्षावर प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, आदीसह अन्य मागण्यासाठी या पद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख गावातून हाेणार प्रवास
तब्बल २२ दिवसाची ही पदयात्रा असून ६०० किलोमीटरची आहे. २२ मुक्काम आणि दररोज २५ किलोमीटर अंतर चालण्यात येणार आहे, ही यात्रा जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने व तालुक्यातील तालुक्याच्या ठिकाणी व प्रमुख गावातून जाणार आहे.
टनाला ५ हजार रुपये भाव हवा
स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, यंदा ऊसाला टनाला ५ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. दुधाला ६० रुपये हमी भाव मिळाला पाहिजे. वजन काटे ऑनलाईन करा , द्राक्ष बेदाण्याचा खप वाढविण्यासाठी जाहिरात सुरू करा, आदीसह अन्य मागण्यासाठी जनजागृती व संघटन या हेतूने दि. १२ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यात जन आक्रोश पदयात्रा काढत आहोत.
[blockquote content=”राज्य सरकार जर जनतेकडून कोट्यवधींचा कर सरकार गोळा करीत असेल आणि सर्वच गोष्टी कंत्राटी पद्धतीने करणार असेल, तर राज्य सरकार देखील कंत्राटी पद्धतीने चालवा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद देखील कंत्राटी पद्धतीने भरा, आम्ही कर देखील का भरावा? ” pic=”” name=”- राजू शेट्टी, माजी खासदार”]