परभणी : सत्तांतर झाल्यापासून भाजप-शिंदे गट व मविआ नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरु आहे. दरम्यान, आता शिवसेना उपनेता तसेच ठाकरे गटाच्या फायरब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अभिनेत्री, मॉडेल व आयटम गर्ल राखी सावंत (Rakhi Sawant) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यात तुलना केली आली आहे. त्यामुळं कालपासून चर्चंना उधाण आलं असून, राखी सावंत व अमृता फडणवीस यांच्यात साम्य काय आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आज परभणीत पोहोचली. यावेळी सुषमा अंधारे बोलत होत्या. त्यांच्या या तुलनेवरुन आका भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राखी सावंतची तुलना अमृताशी माझ्याशी नाही…
दरम्यान, राखी सावंत गायिका आहेत, अमृता फडणवीसही गायिका आहेत. तसेच राखी सावंत मॉडेल आहेत, तसं अमृता फडणवीसही मॉडेल आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राखी सावंत आणि अमृता फडणवीस यांची तुलना केली आहे. राखी सावंत यांची तुलना अमृता फडणवीस यांच्याशी होऊ शकते माझ्याशी नाही, असं म्हणत मोहित कंबोज यांनी केलेल्या तुलनेचा अंधारेंनी समाचार घेतला आहे. “सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहिणी आहेत,” असं वक्तव्य कंबोज यांनी केलं होतं. याला जोरदार प्रतिउत्तर अंधारेंनी दिलं आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
परभणीत बोलताना अंधारे म्हणाल्या की, “आमची राखी ताई सिंगर आहे. आमच्या अमृता वैनी सिंगर आहेत. आमची राखी ताई मॉडेल आहे. आमच्या अमृता वैनींपण मॉडेल आहेत. राखी सावंत या बिचारी माऊलीची तिच्या क्षेत्रानुसार तुलनाच होऊ शकेल तर ती फार फार तर आमच्या अमृता वैनींसोबत होईल. असं काय करता दादा? बघा, आमच्या राखी ताईंच्या चेहऱ्याची सर्जरी झालीय, आमच्या अमृता वैनींचीसुद्धा चेहऱ्याची सर्जरी झालीय. जर तुमचा उद्देश चांगला असेल तर तुम्हाला हे सत्य मान्य करावं लागेल”, असं सुषमा अंधारे आपल्या भाषणात म्हणाल्या. अंधारे यांच्या या तुलनेवरुन आका भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.