मागील १७ वर्षांपासून ‘होम मिनिस्टर’ (Home Minister)हा कार्यक्रम संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठिणी देऊन सन्मान आणि कौतुक करतोय. ‘होम मिनिस्टर’च्या सध्या दिवाळी विशेष(Home Minister Diwali Special Episodes) भागांमध्ये काही खास पाहुणे या कार्यक्रमातून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या सौभाग्यवती(Ramdas Athawale In Home Minister) प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आठवले यांचा सहभाग असलेला ‘होम मिनिस्टर’चा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
[read_also content=”माझ्या विरोधात आंदोलन करा, माझे कितीही पुतळे जाळा मी तुम्हाला आरसा दाखवणारच – नवाब मलिक https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/protest-against-me-no-matter-how-many-statues-i-burn-i-will-show-you-the-mirror-nawab-malik-nrkk-201047/”]
रामदास आठवले आले की त्यांनी काहीतरी चारोळी साजर करणं अपेक्षितच असतं. आठवलेंना छोट्या आणि खुमासदार कविता करण्याचा छंद असल्याचंही सगळ्यांना ठाऊक आहे. शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवले यांनी असाच एक मजेदार उखाणा कार्यक्रमात घेतला. बांदेकर भाओजींनी लग्नाची तारीख विचारली असता आठवले यांनी स्वतःच्या अंदाजात उखाणा घेतला ‘माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा, म्हणून हिच्यावर होता माझा डोळा’. त्यांचा हा मजेदार उखाणा ऐकून बांदेकर भाओजींसोबत सगळेच हसून लोटपोट झाले.