Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील लोकशाही पराभूत झाली नाही, तर…; रमेश चेन्नीथला यांचा हल्लाबोल

लोकशाही संस्थाना ताब्यात घेऊन आपल्या फायद्यासाठी जनमताची चोरी करण्यात आली, असा हल्लाबोल रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 08, 2025 | 12:40 AM
महाराष्ट्रातील लोकशाही पराभूत झाली नाही, तर...; रमेश चेन्नीथला यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील लोकशाही पराभूत झाली नाही, तर...; रमेश चेन्नीथला यांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीबाबत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आकडेवारीसह मांडलेले सत्य हा फक्त निव्वळ लेख नाही तर भारताच्या लोकशाहीवरील योजनाबद्ध केलेल्या आघाताचे सत्य उघड करणारा दस्ताऐवज आहे. लोकशाही संस्थाना ताब्यात घेऊन आपल्या फायद्यासाठी वाकवून कपट, फसवणूक करून महाराष्ट्रात जनमताची चोरी करण्यात आली, असा हल्लाबोल महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.

२०२४ साली महाराष्ट्राचे प्रभारीपद स्वीकारल्यानंतर माझ्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच लोकसभेत काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीने मोदी लाटेला थोपवले आणि महाराष्ट्रात भाजपचा पराभव केला. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात झालेला भाजपचा पराभवच त्यांच्या पूर्ण बहुमताच्या मार्गातील मुख्य अडथळा ठरला. मात्र, अवघ्या सहा महिन्यांत असे काय घडले? ज्या महाविकास आघाडीला १७० हून अधिक जागा मिळायला हव्या होत्या, ती केवळ ५० जागांवर आली, ही कुणालाही पचण्यासारखी बाब नाही, असं चेन्नीथला म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले, ज्या मोदींचा महाराष्ट्रात पराभव झाला त्याच महाराष्ट्रात ज्यांच्या राजकारणावर विश्वासघाताचा, संधीसाधूपणाचा आणि गद्दारीचा शिक्का लागला आहे त्यांनी असा काय पराक्रम केला की ज्यामुळे त्यांनी एवढा प्रचंड विजय मिळवला. ही काही सहज घडलेली गोष्ट नाही. हा एक लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील पूर्वनियोजित योजनाबद्ध हल्ला होता. महाराष्ट्रातील लोकशाही हरली नाही, तिचा शिरच्छेद करण्यात आला असे चेन्नीथला म्हणाले.

२०१९ लोकसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या होती ८.९८ कोटी. २०२४ लोकसभा पर्यंत, ही संख्या नैसर्गिक वाढ म्हणून ९.२९ कोटी झाली, म्हणजेच पाच वर्षांत ३१ लाखांची वाढ झाली परंतु केवळ पाच महिन्यांतच म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीत ही संख्या अचानक ९.७ कोटींवर पोहोचली, म्हणजे ४१ लाख मतदार वाढले. शासनाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रौढांची एकूण संख्या ९.५४ कोटी असताना ९ कोटी ७० लाख मतदार कसे झाले ? असा सवाल चेन्नीथला यांनी विचारला आहे.

आकडेवारीतील तफावत

मतदानाच्या दिवशी प्राथमिक मतदान टक्केवारी ५८.२२% होती. ना कुठे मोठ्या रांगा होत्या, ना कुठे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते मग, एकाच रात्रीत मतदानाची अंतिम आकडेवारी ६६.०५% एवढी कशी वाढली? ही तब्बल ७.८३% टक्क्यांची वाढ म्हणजेच ७६ लाखांहून अधिक मतदारांनी सायंकाळ नंतर मतदान केले. याला जनमताची चोरी नाही तर काय म्हणायचे?

राहुल गांधी यांनी हा विषय केवळ लेखरूपात मांडलेला नाही, त्यांनी लोकशाहीच्या नियोजित अंताच्या कटाचा पर्दाफाश केला आहे. ही लढाई महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. ही लढाई आपल्या लोकशाहीचे अस्तित्व व स्वातंत्र्य टिकवण्याची आहे. निवडणूक आयोगाने जनतेला याचे उत्तर दिले पाहिजे. काँग्रेस पक्ष जनतेच्या बरोबर खंबीरपणे उभा आहे. आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवू. जनतेने सजग राहावे, सतत माहितीवर नजर ठेवावी आणि एकत्र राहावे. कारण आपण आता जर या दरोड्याकडे डोळेझाक केली तर आपले उरलेले स्वातंत्र्यही हिरावले जाईल असे चेन्नीथला म्हणाले.

Web Title: Ramesh chennithala has criticized bjp over the assembly election results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 12:40 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • PM Narendra Modi
  • Ramesh Chennithala

संबंधित बातम्या

अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल; दिलीप वळसे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
1

अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल; दिलीप वळसे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी
2

खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन
3

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन

दहा दिवसांत आम्हाला घराचा ताबा मिळावा, नाहीतर आम्ही…; पुण्यात बिल्डरविरोधात सदनिकाधारकांचा संताप
4

दहा दिवसांत आम्हाला घराचा ताबा मिळावा, नाहीतर आम्ही…; पुण्यात बिल्डरविरोधात सदनिकाधारकांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.