Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : रस्त्याची चाळण पण प्रशासानाचा मात्र डोळेझाक; गावकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

तालुक्यातील खाडीपट्टय़ातील कोंढे-करंबवणे या महत्त्वाच्या मार्गावरील खोपड-कालुस्ते लहान पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वर्ष उलटले, तरीही पोच मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम रखडलेले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 25, 2026 | 07:11 PM
Ratnagiri News : रस्त्याची चाळण पण प्रशासानाचा मात्र डोळेझाक; गावकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा
Follow Us
Follow Us:
  • रस्त्याची चाळण पण प्रशासानाचा मात्र डोळेझाक
  • गावकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा
चिपळूण :  तालुक्यातील खाडीपट्टय़ातील कोंढे-करंबवणे या महत्त्वाच्या मार्गावरील खोपड-कालुस्ते लहान पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वर्ष उलटले, तरीही पोच मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम रखडलेले आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील ग्रामपांयतींनी तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी पूल ठेकेदारासमोर हतबल झालेले असल्याने भिले, करंबवणे, मालदोली तसेच परिसरातील नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आता संतप्त ग्रामस्थांनी १ मे रोजी आंदोलना इशारा दिला आहे.

खाडीपट्टय़ातील असंख्य गावांना जोडणाऱ्या कोंढे-करंबवणे मार्गावरील खोपड-कालुस्ते नदीवरील लहान पूल अलिकडच्या काळात कमकुवत झाला होता. त्यामुळे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून या पुलासाठी कोटीहून अधिकचा निधी मंजूर झाला. या पुलाच्या ठेकेदाराला 23 सप्टेंबर 2025 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराने पुलाचे मुख्य बांधकाम वेळेत पूर्ण केल्याचे सांगितले असले, तरी पोच मार्गाचे आवश्यक खडीकरण व डांबरीकरण आजतागायत करण्यात आलेले नाही. गतवर्षी पावसाळा संपल्यानंतर काम सुरू करण्याचे आश्वासन देऊनही ठेकेदाराने दखल घेतली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

याबाबत कालुस्ते बुद्रुक ग्रामपंचायतीने 8 जानेवारी 2026 रोजी लेखी पत्राद्वारे रोजगार हमी योजना कार्यालयाकडे तक्रार नोंदवली आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी उपविभागीय कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करून अपघाताची शक्यता व्यक्त केली आहे. रस्त्याची दयनीय अवस्था आणि अपूर्ण पोच मार्गामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून पावसाळय़ापूर्वी काम पूर्ण न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी रोहयो उपविभाग चिपळूण यांच्या वतीने ठेकेदारास तातडीचे पत्र पाठवून उर्वरित काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा निविदेच्या अटी-शर्तींनुसार पुढील कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. मात्र सदर ठेकेदाराने त्या पत्रालाही केरी टोपली दाखवली. दरम्यान, प्रशासनाच्या वारंवार सूचनांकडे ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता 1 मे रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Ratnagiri News : चिपळूणमध्ये अवकाळीचा मोठा फटका; मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

आमचा संयम संपत चालला आहे. अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. खाडीपट्टय़ातील या महत्त्वाच्या मार्गावरील पूल पूर्णत्वास जाऊनही पोच मार्ग अपूर्ण राहिल्याने विकासकामांतील हलगर्जीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे हा सगळा प्रकार तर दुसरीकडे तालुक्यातील पाली-निरबाडे, मुसाड- कुरवळ खेड, कुरवळ जावळी (ता. खेड) या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा रस्ता वाहतुकी योग्य करण्यात यावा, अशी मागणी येथील मुसाड ग्रामस्थांनी केली असून अन्यथा २८ एप्रिल पासून उपोषण करू, असा इशारा येथील मुसाड ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

पाली- निरबाडे, मुसाड- कुरवळ खेड, कुरवळ जावळी हा मुख्य रस्ता अनेक गावांना जोडणारा असल्याने ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवा या रस्त्यावरून सतत ये -जा करीत असतात. या रस्त्याची दुरावस्था असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे. विशेषत: पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनते. यासंदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र, अद्याप तितकीशी दखल घेतली गेलेली नाही. यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातूनच आपली वाहने चालवावी लागत आहेत. तरी या मार्गावरील खड्डे बुजवणे तसेच आवश्यक ती दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी मुसाड ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा 28 एप्रिल रोजी उपोषण छेडू, असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

चिपळूण तालुका डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी निसार शेख तर कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग यांची बिनविरोध निवड

Web Title: Ratnagiri news roads are being cleaned but the administration is turning a blind eye villagers take an aggressive stance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.