रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील प्रयोगशील आंबा बागायतदार दत्ताराम दाजी पडयार यांच्या बागेत हा अवकाळी हापूस तयार झाला आहे. त्यांच्या बागेतील चार डझन (४८ नग) हापूस आंब्यांची पहिली पेटी रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यापारी ‘सतीश पवार बंधू’ यांच्या मार्फत बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्यात आली होती. या पहिल्यावहिल्या पेटीला २१ हजार रुपयांचा मोठा दर मिळाला. त्यामुळे हिशोब केल्यास एका डझन आंब्यासाठी तब्बल ५,२५० रुपये इतका दर मिळाला आहे, जो या मोसमातील सुरुवातीचा एक नवा विक्रम मानला जात आहे.
Ratnagiri: हापूस आंब्याला मिळणार नवी ओळख! निवेंडी मॅंगो पार्कसाठी भूसंपादन वेगात
हंगामाच्या तब्बल चार महिने आधी बाजारात आलेल्या या पहिल्या वहिल्या राजापूर/रत्नागिरी हापूस आंब्याचे पहिले मानकरी आणि ग्राहक होण्याचा मान कौस्तुभ दीक्षित यांनी मिळवला आहे. त्यांनी हा ऐतिहासिक आंबा २१ हजार रुपयांना खरेदी केला.
सामान्यतः हापूस आंब्याची आवक फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चमध्ये वेगाने सुरू होते. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारातच बाजारात असा तयार आणि दर्जेदार हापूस उपलब्ध होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. एका बाजूला नियमित हंगाम सुरू होण्यासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी बाकी असताना, दुसरीकडे पहिल्याच पेटीला मिळालेला २१ हजार रुपयांचा विक्रमी दर सध्या संपूर्ण कोकणात आणि आंबा बाजारपेठेत मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. हंगामाच्या तब्बल चार महिने आधी बाजारात आलेल्या या पहिल्या वहिल्या राजापूर/रत्नागिरी हापूस आंब्याचे पहिले मानकरी आणि ग्राहक होण्याचा मान कौस्तुभ दीक्षित यांनी मिळवला आहे.
Alphanso वर ‘अल निनो’चा सर्जिकल स्ट्राइक! कोकणच्या ‘राजा’ची अवस्था बिकट, बागायतदार चिंतेत
Ans: रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी कौसतुभ दीक्षित यांनी खरेदी केली आहे.
Ans: हापूस आंब्याच्या पेटीला २१ हजार रुपयांचा मोठा दर मिळाला आहे.






