विधानसभा निवडणुकांची घोषणा; चार राज्यांत १९ जूनला होणार मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी घोषित करण्यात आली आहे. २६३ क्रमांकाच्या दापोली विधानसभा मतदार संघात एकूण तीन तालुक्याचा समावेश आहे. यामध्ये एकूण ३९२ मतदान केंद्रे समाविष्ट आहेत. त्यापैकी मंडणगड तालुक्यामध्ये ७४, दापोली तालुक्यामध्ये २१२ आणि खेड तालुक्यांमध्ये १०६ मतदान केंद्रे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख २० नोव्हेंबर २०२४ आहे. दापोली विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र हे उपविभागीय अधिकारी कार्यालय दापोली या ठिकाणी स्वीकृत केले जाणार आहे.
हेदेखील वाचा- जम्मू – काश्मीरमध्ये राजकारण रंगले; ओमर अब्दुलांच्या सरकारमध्ये काँग्रेस सामील होणार नाही…?
दिनांक २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नामनिर्देशन स्वीकारले जाणार आहेत. दापोली मतदारसंघांमध्ये सद्यस्थितीमध्ये एकूण दोन लाख ८६ हजार ९८३ मतदार यांची नोंदणी झाली आहे, त्यामध्ये १ लाख ३७ हजार ७७४ पुरुष आणि १ लाख ४९ हजार २९९ स्त्रिया एवढे मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या १५६० आहे तर ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ३६६८ एवढी आहे. या निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदार आणि ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
सदर निवडणुकीच्या कामकाजाकरता ६० क्षत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी एकूण भरारी पथकाच्या अठरा टीम आणि सात स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान अधिकारी कर्मचारी पथक यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी ६०एसटी गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का; तब्बल 600 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
दापोली विधानसभा क्षेत्रामधील ३९२ मतदान केंद्र पैकी १९६ मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा करण्यात आलेली आहे. याबाबात उपविभागीय अधिकारी डाॅ. अजित थोरबोले यांनी सांगितलं की, दापोली विधानसभा क्षेत्रामधील सर्व मतदार यांना विनंती करण्यात येते की आपण वोटर हेल्पलाइन या मोबाईल ॲपद्वारे आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती घेऊ शकता. सर्व मतदार यांनी उस्फुर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा दापोली उपविभागीय अधिकारी डाॅ. अजित थोरबोले यांनी केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. दरम्यान एकाच टप्प्यात २८८ जागांसाठी राज्यात मतदान होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. २६ नोव्हेंबर आधी राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी न जाऊ शकणाऱ्यांसाठी घरातून मतदानाची सुविधा करून देण्यात येणार आहे.