Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas: ‘गुहागर’मधील दोन दिवसांतच बंद होणार? हॉटेल व्यावसायिकच ‘गॅस’वर

श्रृंगारतळी ही गुहागर तालुक्याची मध्यवर्ती व सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. येथे नौकरी-व्यवसायासाठी अनेक नागरिक ग्रामीण भागातून येतात, सर्व प्रकारची शासकीय कार्यालये येथे आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2026 | 02:14 PM
LPG Gas: ‘गुहागर’मधील दोन दिवसांतच बंद होणार? हॉटेल व्यावसायिकच ‘गॅस’वर
Follow Us
Follow Us:

श्रृंगारतळीत कमर्शियल सिलिंडर गॅसचा तुटवडा
टंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
व्यावसायिकावर हॉटेल बंद करण्याचा येणार वेळ

गुहागर: गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी श्रृंगारतळी बाजारपेठेतील सर्व हॉटेल दोन दिवसांतच बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कमर्शियल सिलिंडरचा तुटवडा व ते देणे बंद केल्याने जेमतेम १ दिवस पुरेल एवढेच सिलिंडर गॅस उपलब्ध असल्याने ही आपत्ती व्यवसायिकांवर ओढवली आहे. बहुसंख्य हॉटेल व्यवसायिकांनी (Ratnagiri) हॉटेलमध्ये सूचना फलक लावून तळलेले पदार्थ बंद केल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे श्रृंगारतळी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना नाष्टा, जेवण मिळणे जिकरीचे होणार असून हॉटेल व्यवसायिकांच्या धंद्यावर याचा मोठा आर्थिक परिणाम होणार आहे.

महाराष्ट्रात गॅसचा मोठी टंचाई निर्माण झाली आहे. भारतात गॅस पुरवठा कमी होत असल्याने याचा कमर्शियल गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद पडण्याची किंवा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅसचा व्यावसायिकांवर हॉटेल बंद तुटवडा निर्माण झाल्यामुळे रेस्टॉरंट्सना तळलेले पदार्थ बंद करावे लागत आहेत आणि व्यवसाय सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनांची मागणी होत आहे.

RATNAGIRI: रत्नागिरीत ९५ टक्के व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण बंद?

श्रृंगारतळी ही गुहागर तालुक्याची मध्यवर्ती व सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. येथे नौकरी-व्यवसायासाठी अनेक नागरिक ग्रामीण भागातून येतात, सर्व प्रकारची शासकीय कार्यालये येथे आहेत. त्यामुळे येथे दिवस-रात्र खवय्यांचा राबता असतो. शृंगारतळीत सुमारे १२ हॉटेल आहेत, वडापावचे २५ स्टॉल तर चायनीजचे १५ स्टॉल येथे थाटलेले दिसून येतात. एकूणच या व्यवसायिकांवर मोठी आर्थिक टांगती तलवार आहे.

कमर्शियल सिलिंडर देणे बंद केल्याने हॉटेलमध्ये माजेकेच पदार्थ सध्या तयार केले जात आहेत. विशेष करून तळलेले पदार्थ बंद करण्यात आले आहेत. आता एक दिवसात हॉटेल बंद करण्याची नामुष्की व्यवसायिकांवर येणार असल्याची माहिती हॉटेल व्यवसायिकांनी दिली आहे. तसे फलक हॉटेलमध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी लावण्यात आले आहेत.

स्वयंपाकघर सध्या अडचणींच्या भोवऱ्यात? LPG चा तुटवडा अन् उद्योगधंद्यावरही परिणाम

स्वयंपाकघर सध्या अडचणींच्या भोवऱ्यात?

अखेर, गॅस संकटामुळे, केंद्र सरकारला आवश्यक वस्तू देखभाल कायदा (ESMA) लागू करावा लागला. भारतात इंधनाच्या प्रश्नावर चिंता पसरली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखली आहे, जी जगातील २० टक्के इंधनाची वाहतूक करते. सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, कतार आणि युएई येथून भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरियाला होणारा कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा या सामुद्रधुनीतून थांबवण्यात आला आहे. येथून ८४ टक्के तेल आशियाई बाजारपेठेत पोहोचते.

Web Title: Hotels and restaurants closed because shortage of lpg gas cylinder guhagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Commercial LPG Cylinder
  • Gas Cylinder
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले
1

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
2

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Ratnagiri : पूरस्थिती, भूस्खलन आणि विरोधकांवर उदय सामंतांचा पलटवार
3

Ratnagiri : पूरस्थिती, भूस्खलन आणि विरोधकांवर उदय सामंतांचा पलटवार

Ratnagiri News : मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागाचे आव्हान पेलत महावितरणचे यश; प्रभावित गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत
4

Ratnagiri News : मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागाचे आव्हान पेलत महावितरणचे यश; प्रभावित गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.