खडी क्रेशर आणि सुरुंग स्फोटामुळे हादरलं गाव ;महसूल अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा
दापोली / समीर पिंपळकर : महसूल अधिकाऱ्यांच्या बेपर्वा वृत्तीमुळे दापोली तालुक्यातील हातीप, विसापूर ,शिरखळ-चिंचाळी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत क्रेशर खदाण व्यवसायिकाने संपूर्ण गाव उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. खदाणीतील स्फोटामुळे, विसापूर ,हातीप,वळवण दगडवणे,पालगड,सोडेघर गाव हादरून गेले आहे. हातीप ,ओळवण, विसापूर गावात अनधिकृत खदाण सुरु आहे. या खदाणीतील स्फोटांचे हादरे सर्व ग्रामस्थ गेली कित्येक महिने झेलत आहेत. हातीप ओळवण गावासाठी असलेला सार्वजनिक रहदारीचा रस्ता ही खदाणीत जाणाऱ्या अवजड वाहनांनी उध्वस्त केला आहे. खदाणीत क्षमतेपेक्षा जास्त भूसुरूंग स्फोट घडवून आणले जात असल्याने गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत.
खदाणीपासून नजीक असलेल्या वाड्या व गावना सर्वात जास्त हादरे बसत असून घरे कोसळली तर जीवितहानी होण्याची भिती निर्माण झाली आहे. भुसुरूंग स्फोटामुळे ग्रामस्थांच्या घरातील भांडी हादरून खाली पडत आहेत.विसापूर येथे असलेल्या क्रेशर ची खदानी मध्ये सुरंग लावून भला मोठा डोंगर पोखरला आहे.हा डोंगर जर कोसळला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.खदानी पासून क्रेशर पयत्न ओरलोड व बिना परवाना वाहतूक केली जाते.
क्रेशर वरून रॉयल्टी एक व फेर्या अनेक, हिते असलेल्या डांबर प्लाड मधून शमतेच्या बाहेर गाड्या भरून वाहतूक केली जाते.महसूल प्रशासनाच्या नियमानुसार खाण व्यवसायिकांना उत्खननास परवानगी असली तरी काही खाण व्यवसायिक दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करतात. त्यात महसूल प्रशासनाची रॉयल्टी बुडत असून शिवाय ज्या परिसरात खाण व्यवसाय सुरू आहेत. तेथील पर्यावरणाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. खाण व्यावसायिकाने आर्थिक हव्यासापोटी मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याने याठिकाणी खाणीमधील भू-पातळी खोल गेली आहे. त्यातून परिसरात भू-स्खलनासारखा धोका निर्माण झाला आहे. ओळवण हातीप गावात पारंपरिक शेती कसणारा शेतकरी वर्ग मोठा आहे. पावसाळी पिके घेणारा शेतकरी अनधिकृत खाण व्यवसायामुळे भविष्यात संकटात येणार आहे. खाण व्यवसायिक गब्बर होऊन गाव सोडून जाईल, मात्र बाराही महिने शेतीवर गुजराण करणारा वर्ग येथील खाण व्यवसायामुळे पार देशोधडीला लागण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याच धर्तीवर ग्रामस्थांनी एका ग्रामसभेत दोनदा ठराव केले.
मात्र महसुल विभागाकडून या खदाणीवर कोणतीच कारवाई केली गेली नाही.हे जमिनीत लावले जाणारे सुरुंग गावाच्या कोणत्याही विकासकानसाठी नसून क्रेशर मालक यांच्या स्वाताच्या व्यावसायासाठी आहे.मग या गोरगरीब जनतेला नाहक त्रास का? दगड खाणीमुळे धुळीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरिकांचा व लहान मुलांचा श्वास कोंडला जात आहे हा भयंकर व जीवघेणा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून याकडे संबंधित प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची टीका या भागातील नागरिक करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त करीत आहेत तर खडी उत्पादन करणारे क्रेशर हे कारखाने गावाला लागूनच आहेत या ठिकाणी रस्ते आरसीसी बांधकाम असं अधिकामानात लागणारी खरी बनवली जाते या ठिकाणी दगड उपलब्ध करण्यासाठी येथील डोंगर भागाला सुरंग लावण्याचे प्रकार नेहमीच सुरू असल्याने यामुळे जमिनीला हादरे बसत असल्याने या परिसरात साधन संपत्ती नष्ट झाली काय किंवा राहिली काय याची कोणालाही सोयरसुतक नसल्याचे वास्तव्याचे चित्र सध्या या ठिकाणी दिसून येते.
सध्या उन्हाळ्याचे दिवस, असून अधून मधून सुटणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने धूळ परिसरात पसरले जात आहे. त्यामुळे परिसरातील अनेकांना शिंका येणे स्क्रीन एलर्जी डोळ्यांचे केस डोक्याचे केस गळणे फुफुसाचा विकार डोळ्यांची जळजळ डोळे दुखी तर क्रेशर च्या सतत धडधडणाऱ्या आवाजामुळे अनेकांना हृदयविकार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे लहान मुलेही यातून सुटलेली नाहीत तसेही अशा दम्याच्या आजाराने शिकार बनत चालले असल्याचे प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.तरिही खदाण बंद होण्याची शक्यता मावळत चालली आहे. या बेकायदा खदाणीतून किती ब्रास दगड-माती उत्खनन झाले आहे, याची मोजणी करण्याचे काम महसूल विभागाला करावे लागते. महसूल विभाग जितक्या उत्खननास परवानगी देते तितकेच उत्खनन खदाणव्यवसायिकास करावे लागते. मात्र विसापूर ,हातीप ,ओळवण गावातील खदाण मालक असून महसूल विभागालाच धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन करू लागला आहे. या प्रकाराकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे एखाद्या ग्रामस्थाचा जीव जाण्याची वाट महसुल प्रशासन पाहतेय का असा संतप्त सवाल केला जात आहे.