Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan News : लोटे प्रदूषणात घट अन् खाडीत जीवसृष्टीची चाहूल; कोळंबी-खेकड्यांच्या पुनरागमनाने मच्छीमार सुखावले

करंबवणे खाडीत पुन्हा जीवसृष्टीची चाहूल लागली असून कोळंबी, खेकडे आणि कोलीम यांसारखे जलचर पुन्हा मिळू लागल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लोटे परिसरातील प्रदूषणात झालेली घट आणि सांडपाणी वाहिनीच्या नूतनीकरणामुळे खाडीच्या पर्यावरणात सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 06, 2026 | 11:13 AM
लोटे प्रदूषणात घट अन् खाडीत जीवसृष्टीची चाहूल; कोळंबी-खेकड्यांच्या पुनरागमनाने मच्छीमार सुखावले

लोटे प्रदूषणात घट अन् खाडीत जीवसृष्टीची चाहूल; कोळंबी-खेकड्यांच्या पुनरागमनाने मच्छीमार सुखावले

Follow Us
Follow Us:
  • करंबवणे खाडीत पुन्हा जीवसृष्टीची चाहूल
  • कोळंबी, खेकडे आणि कोलीम मिळू लागले
  • मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण
Konkan News Marathi : एकेकाळी औद्योगिक प्रदूषणामुळे बदनाम झालेल्या करंबवणे खाडीने पुन्हा नवजीवन धारण करण्यास सुरुवात केली आहे. दीर्घकाळानंतर खाडीतील विविध भागांमध्ये कोळंबी, खेकडे आणि कोलीम मिळू लागल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाच्या घटनांमध्ये झालेली घट, सीईटीपीमधील सुधारणा आणि एमआयडीसीने बदललेली सांडपाणी वाहिनी यांचा सकारात्मक परिणाम आता खाडीच्या जैवविविधतेवर दिसून येत आहे.

चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली या चार तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या सुमारे ४० किलोमीटर लांबीच्या करंबवणे खाडीवर हजारो मच्छीमारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. एकेकाळी रावस, पापलेट, रेणवी, कोळंबी, टोळके आणि खेकडे यांसारख्या दर्जेदार मासळीची रेलचेल असलेल्या या खाडीला १९९७ मध्ये लोटे औद्योगिक वसाहतीतून झालेल्या रासायनिक प्रदूषणाचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर अनेक वर्षे खाडीतील मत्स्यसंपदा आणि स्थानिकांचे जीवनमान यावर गंभीर परिणाम झाला.

Redi Ganpati: कोकणातील दोन भुजा असलेला रेडीचा गणपती, काय आहेत या मूर्तीची वैशिष्ट्ये जाणून घ्या

मात्र गेल्या काही वर्षांत सीईटीपीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा, विस्तारीकरण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी उचललेल्या उपाययोजनांमुळे परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सीईटीपीचे अध्यक्ष सतीश वाघ यांच्या नेतृत्वाखाली प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे खाडीत जाणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण आणि त्याचा परिणाम कमी झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, खाडीत जाणारी सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी गळतीमुळे खराब झाली होती. त्यामुळे एमआयडीसीने सुमारे तीन किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकली असून आणखी विस्ताराचे काम सुरू आहे. परिणामी, यंदा प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर मासे मृतावस्थेत आढळण्याच्या घटना जवळपास घडलेल्या नाहीत.

सध्या करंबवणे, केतकी, भिले परिसरातील आतील भागात खेकडे आणि मिळत आहेत. मालदोलच्या खालच्या भागात बारीक कोलीमही जाळ्यांमध्ये सापडत आहे. मोठी कोळंबी चिपळूण बाजारात तब्बल हजार रुपये किलो दराने विकली जात असून लहान कोळंबीला ४०० ते ५०० रुपये किलो भाव मिळत आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. मात्र खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या परिसरात मासळीचे प्रमाण अद्याप पूर्वीसारखे झालेले नसल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात. तरीही संपूर्ण खाडी परिसरातील परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच सुधारल्याचे चित्र आहे.

‘प्रदूषणाला पूर्ण आळा बसला तर खाडी आणखी बहरेल’

“खाडीत सध्या विविध प्रकारची मासळी, कोळंबी, खेकडे आणि कोलीम मिळत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. मात्र जगबुडी परिसरात मासळीचे प्रमाण अजूनही कमी आहे. काही कारखान्यांकडून अजूनही चोरट्या मार्गाने नाल्यांमधून सांडपाणी सोडले जाते. त्याला पूर्णपणे आळा बसला तर करंबवणे खाडी पुन्हा पूर्वीच्या वैभवाने मासळीने बहरून जाईल,” असे मत दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीचे संजय जुवळे यांनी व्यक्त केले.

Konkan Nuclear Project : कोकणात अदानी-रिलायन्सची एन्ट्री! सरकारचा मोठा करार, लाखो कोटींची गुंतवणूक पण त्या आंदोलनांचं काय?

Web Title: Karambavane khadi marine life return lote pollution reduced fishermen relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • maharashtra
  • pollution

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.