Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणची ‘जीवनवाहिनी’ बनली ‘मरणवाहिनी’! हजारो कोटींचा Mumbai -Goa महामार्ग आहे की अपघातांचा सापळा?

Mumbai Goa Highway: महामार्गाच्या अनेक भागांमध्ये काम अपूर्ण असल्याच्या आणि दोष निर्माण झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 03, 2026 | 08:17 PM
कोकणची ‘जीवनवाहिनी’ बनली ‘मरणवाहिनी’! हजारो कोटींचा Mumbai -Goa महामार्ग आहे की अपघातांचा सापळा?
Follow Us
Follow Us:
  • मुंबई – गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामावर नाराजी
  • सामान्य नागरिकांच्या अपेक्षांची होते आहे मोठी उपेक्षा
  • काम ९७ टक्के पूर्ण झाल्याचा दावा
लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कोकणाची जीवनवाहिनी मानला जातो. या महामार्गावरून दररोज हजारो नागरिक, पर्यटक, व्यापारी आणि शेतकरी प्रवास करतात. मात्र आज या महामार्गाची अवस्था पाहिली कोकणवासीयांची घोर फसवणूक झाल्याची भावना निर्माण होत आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याला योग्य लेव्हल नाही. गाडी वेगात असताना अचानक चढ-उतार जाणवतात. पुलांवरील (Accident) सांधे व्यवस्थित जुळवले नसल्याने वाहन पुलावर चढताना किंवा उत्तरताना जोरात आपटते. त्यामुळे वाहनांचे नुकसान तर होतेच, पण प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो.

महामार्गावरील अनेक वळणे अजूनही धोकादायक आहेत. रस्ता चौपदरी झाला, पण नियोजनातील त्रुटी कायम राहिल्या. काही ठिकाणी सेवा रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. पावसाळ्यात पाणी साचते, खड्डे पडतात आणि अपघातांचा धोका वाढतो. महामार्गाच्या अनेक भागांमध्ये काम अपूर्ण असल्याच्या आणि दोष निर्माण झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार? ‘… मगच टोल घ्या’; Mumbai -Goa चे काम कधी होणार पूर्ण?

कोकणातील जनतेला अनेक वर्षे ‘यावर्षी महामार्ग पूर्ण होईल’, ‘प्रवास ६ तासांत होईल’, अशी आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना खड्डे, वाहतूक कोंडी, अपूर्ण कामे आणि निकृष्ट दर्जाचा रस्ता यांचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम ९७ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष अनुभव वेगळीच कहाणी सांगतो. या महामार्गाच्या कामाची उत्त्वस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई झाली पाहिजे. कोकणवासीयांना आश्वासने नकोत, तर सुरक्षित, दर्जेदार आणि टिकाऊ महामार्ग हवा आहे अशी मागणी आता जोर धरू लागली असून आता या बेजबाबदार कामाच्या विरोधात जनतेतूनच उद्रेक होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

थेट टोल प्लाझा जप्तीचाच न्यायालयाने दिला आदेश; ऐतिहासिक निर्णयाचीच आता सगळीकडे चर्चा…

Mumbai -Goa चे काम कधी होणार पूर्ण?

तब्बल १७ते १८ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण नेमके कधी पूर्ण होणार, हा यक्षप्रश्न आता संपूणर्ण कोकणवासीयांसह लाखो प्रवाशांना पडला आहे. सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या या महामार्गाच्या कामाची पोलखोल यंदाच्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा उघड्यावर आणली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्यांचे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले असून, कॉंक्रिटीकरण केलेल्या रस्त्यालाही अनेक ठिकाणी तडे पडल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Many years back work in progress at mumbai goa highway kokan peole angry to government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Farmers
  • Kokan News
  • Mumbai Goa Express Way

संबंधित बातम्या

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती
1

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
2

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही
3

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
4

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.