Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने कांदा खरेदी दरात केली वाढ, आता प्रति क्विंटल मिळणार तब्बल इतकी रक्कम

केंद्र सरकारने बफर स्टॉक अंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात १३ टक्क्यांची थेट वाढ केली आहे. शनिवार, ४ जुलै २०२६ पासून सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे NAFED आणि NCCF कडून कांदा खरेदीचा दर प्रति क्विंटल १,८७५ रुपयांवरून थेट २,१२५ रुपये इतका करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 04, 2026 | 04:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकसाठी कांद्याची सरकारी खरेदी जलद करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्याच्या खरेदी दरात १३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ज्याचा दर २,१२५ रुपये प्रति क्विंटल केला आहे. यापूर्वी हा भाव १,८७५ रुपये प्रति क्विंटल होता. या हंगामातील सरकारी खरेदी दरांमधील ही पाचवी दरवाढ आहे. हे सुधारित दर ४ जुलै २०२६ पासून देशभरात लागू होणार आहेत.

कांद्याने नाही तर आता टोमॅटोने रडवलं, भाव पुन्हा कडाडले; काही दिवसांत 100 रुपये किलो होणार?

वारंवार भाववाढ होऊनही, खरेदी मंदावली

किंमत स्थिरीकरण निधी PSF अंतर्गत कांद्याची सरकारी खरेदी अत्यंत संथ गतीने होत आहे, त्यामुळे खरेदीला गती देण्यासाठी सरकारला वारंवार दरांमध्ये सुधारणा करावी लागत आहे. १ जून रोजी खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यापासून, सरकारने आतापर्यंत २०२६ च्या बफर स्टॉकसाठी केवळ २,००० टन कांदा खरेदी केला आहे.

हंगामाची सुरुवात: ₹१२.७० प्रति किलो
२२ मे: ₹१५.८० प्रति किलो
१३ जून: ₹१६.५० प्रति किलो
२० जून: ₹१७.३० प्रति किलो
त्यानंतर: ₹१८.७५ प्रति किलो
४ जुलैपासून नवे भाव: ₹२१.२५ प्रति किलो (₹२१२५ प्रति क्विंटल)

कांद्याची बाजारपेठेत स्थिती

शासकीय खरेदी मंद असली तरी, देशात कांद्याच्या उपलब्धतेचे कोणतेही संकट नाही, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे म्हणणे आहे. कृषी मंत्रालयाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, २०२५-२६ मध्ये कांद्याचे उत्पादन ३०७.३७ लाख टन होण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या ३०७.६७ लाख टन या उत्पादनाइतकेच आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात यांसारख्या प्रमुख राज्यांमध्ये कांद्याचा मुबलक साठा आहे. देशभरातील घाऊक बाजारांमध्ये दररोज ५०,००० टनांहून अधिक कांदा दाखल होत आहे. महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कांद्याचा सरासरी घाऊक भाव सुमारे १८ रुपये प्रति किलो आहे. सध्या, देशभरात कांद्याचा सरासरी किरकोळ भाव ३१ रुपये प्रति किलो आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चांगल्या प्रतीचा कांदा सध्या साठवणुकीत असून, पुरवठा कमी असलेल्या आगामी महिन्यांत तो बाजारात आणला जाईल.

मान्सूनचा उशीर आणि सट्टेबाजीचा परिणाम

अधिकाऱ्यांच्या मते, मान्सूनला उशीर झाल्यामुळे आणि देशाच्या काही भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे, काही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी आणि साठेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील नाशिक आणि मध्य प्रदेशाच्या काही भागांमध्ये, ही सट्टेबाजीची क्रिया प्रत्यक्ष मागणीमुळे नव्हे, तर भविष्यात भाववाढीच्या भीतीमुळे होत आहे.
नाशिक परिसरात खरीप कांद्याची पेरणी सुमारे १५ दिवसांनी लांबली आहे, तर कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि चल्लाकेरे पट्ट्यात पेरणी सामान्य पेरणीच्या केवळ ६०% पर्यंतच पोहोचली आहे.

‘या’ बँकेत तुमचं तर खातं नाही ना? RBI कडून मोठा दणका; ठोठावला लाखो रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Onion procurement price increased to 2125 per quintal farmers relief marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • mansoon
  • Mansoon session
  • onion
  • Onion Farmer
  • Onion News
  • Onion Rate

संबंधित बातम्या

कांद्याने नाही तर आता टोमॅटोने रडवलं, भाव पुन्हा कडाडले; काही दिवसांत 100 रुपये किलो होणार?
1

कांद्याने नाही तर आता टोमॅटोने रडवलं, भाव पुन्हा कडाडले; काही दिवसांत 100 रुपये किलो होणार?

मुंबईच्या पावसात रंगणार आमिर खान-गौरी स्प्रॅट यांचा खास दिवस; सरींनी वाढवला रोमँटिक अंदाज
2

मुंबईच्या पावसात रंगणार आमिर खान-गौरी स्प्रॅट यांचा खास दिवस; सरींनी वाढवला रोमँटिक अंदाज

Ambenali Ghat Closed: अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद, पर्याय मार्ग वापरण्याचे आवाहन
3

Ambenali Ghat Closed: अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद, पर्याय मार्ग वापरण्याचे आवाहन

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
4

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.