हापूसला मिळणार जागतिक बाजारपेठ (फोटो- सोशल मिडिया)
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले जाणे शक्य होणार असून, निर्यातीतील अडचणी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. या अभ्यास दौऱ्यात कृषी सभापती महेश नाटेकर यांच्यासह गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, प्रवीण पांचाळ, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, संगमेश्वर पंचायत समिती सभापती शर्वरी वेळळे, परिषद सदस्य प्रमोद निवळकर, कृषी अधिकारी अभिजित गडदे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या संयुक्त भेटीमुळे आंबा निर्यातीबाबतच्या समस्यांवर एकत्रितपणे तोडगा काढणे शक्य होणार आहे.
तांत्रिक प्रक्रियेची दिली माहिती
लोकप्रतिनिधींनी आंबा निर्यातीसाठी आवश्यक विविध तांत्रिक आणि भौतिक प्रक्रियांची प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन पाहणी केली. आंब्याची शास्त्रोक्त प्रतवारी करणे, स्वच्छता राखणे, आधुनिक पंकिंग पद्धती आणि योग्य तापमान नियंत्रित साठवणूक था टप्यांचा समावेश होता, परदेशात, विशेषतः युरोप व आखाती देशांमध्ये आंबा पाठवण्यापूर्वी अनिवार्य मानल्या जाणाऱ्या ‘कोपर हिट ट्रीटमेंट’ आणि ‘इरेडिएशन’ या तांत्रिक प्रक्रियेची माहिती तज्ज्ञांकडून घेतली.
निर्यात केंद्राचे व्यवस्थापक अनिमेष पाटील व त्यांच्या पथकासोबत आयोजित बैठकीत पस्देशातील आंब्याची मागणी आणि तेथील कड़क निकष यावर सविस्तर चर्चा झाली. वाशी येथील केंद्राप्रमाणेच स्थानिक पातळीवर आवश्यक ते सर्व तांत्रिक मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ‘मॅगोनेट’ नोंदणी मोहिमेमुळे जागतिक निर्यातीचे निकष पूर्ण करणे व थेट परदेशी व्यापाऱ्यांशी संपर्क साधणे शेतक-यांना सौपे होणार आहे, लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या या संयुक्त पुढाकारामुळे रत्नागिरीतील जगप्रसिद्ध हापूस आंब्याच्या निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे.






