
Ratnagiri News
येत्या पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत शहरात कोणत्याही प्रकारची पाणीटंचाई निर्माण होऊ नये, हेच पालिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती रत्नागिरी नगरपरिषदेचे पाणी सभापती निमेश नायर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे आणि उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर उपस्थित होते. त्यांनीही पाणीटंचाईच्या धोरणाबाबत पत्रकारांना माहिती दिली.
Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक
शहराला रोज लागणाऱ्या २० एमएलडी पाण्यापैकी बचत व्हावी यासाठी दर सोमवारी पाणी पुरवठा शटडाऊन ठेवला जाणार आहे. महिन्याला सुमारे ८० एमएलडी पाण्याची मोठी बचत यामुळे होणार असून पाण्याचा साठा दीर्घकाळ टिकवणे शक्य होणार आहे. दैनंदिन पाण्याच्या वेळेत १५ मिनिटांची कपात करून पाण्याचा अपव्यय टाळला जाईल. या उपायांमुळे उपलब्ध पाणीसाठा अगदी एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत पुरवणे शक्य होणार असल्याचे नायर यांनी सांगितले.
नवीन पाणी स्त्रोतांवर वेगाने काम सुरू
शीळ धरणातील पाण्याचा साठा जतन करण्यासोबतव नगरपरिषदेकडून पर्यायी आणि नवीन पाणी स्त्रोतांवरही वेगाने काम सुरू करण्यात आले आहे, यात सर्वांत महत्वाचा दिलासा म्हणजे नव्याने बांधण्यात आलेल्या पानवल धरणातून येत्या दोन महिन्यांनंतर शहराला पाणीपुरवठा सुरू होणार आहे, पानवल धरणामध्ये सध्या मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी ते शहरापर्यंत आणग्यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. धरणापासून जलवाहिनी जोडण्याचे काम प्रलंबित असल्याने या पाण्याचा थेट वापर करणे आतापर्यंत शक्य झाले नव्हते. मात्र, आता या कामातील सर्व मार्ग मोकळे झाले असून प्रत्यक्ष कामाला गती देण्यात आली आहे.
Sambhajinagar : वाळूज मधील संतप्त महिलांचा MIDC कार्यालयात ठिय्या, पाण्यासाठी वणवण
पानवल धरणावरून शहरात पाणी
आणण्यासाठी १३०० मीटर अंतराची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण राहिले होते. या अपूर्ण कामामुळे धरणातील मुबलक पाणी असूनही त्याचा वापर रत्नागिरीकरोसाठी करता येत नव्हता, मात्र, पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्याऱ्यांच्या मध्यस्थीनंतर कंत्राटदारांचे प्रलंबित बिल आणि निधीचा प्रश्न मार्गी लावला गेला आहे. पुढील दोन महिन्यांत ही १३०० मीटस्ची जलवाहिनी जोडण्याचे काम पूर्ण केले जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.