Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरी जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट; सर्व शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी, तर ‘या’ जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ७ जुलै रोजी रत्नागिरीतील सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. तर नाशिकमध्ये ३०० मिमी पावसाच्या इशाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगी गड आणि हरिहर गड बंद करण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 06, 2026 | 08:03 PM
रत्नागिरी जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट (Photo Credit- AI)

रत्नागिरी जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरी जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट
  • सर्व शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी
  • तर ‘या’ जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा
रत्नागिरी, दि. ६: रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय हवामान विभागाने मंगळवार, ७ जुलै रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना मंगळवारी (दि. ७) सुट्टी जाहीर केली आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार सर्व अंगणवाड्या, सरकारी व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांशी संबंधित सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.

दरम्यान, नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक प्रवास टाळावा, पूरग्रस्त व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सातारा जिल्ह्यात पावसाचे थैमान! महाबळेश्वरमध्ये १०० वर्षांतील विक्रमी ११ इंच पाऊस; ५ तालुक्यांतील शाळांना सुटी, तर…

नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नाशिकमधील महत्त्वाची पर्यटन स्थळे बंद करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तश्रृंगी देवस्थान तसेच दुगारवाडी धबधबा, हरिहर गडसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवार, 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यासाठी हाय अलर्ट जारी केला असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरदरम्यान काही भागांत सुमारे 300 मिमीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा.

पर्यटनस्थळे आणि देवस्थाने बंद

सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दुगारवाडी धबधबा, हरिहर गड तसेच इतर लोकप्रिय पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. ही बंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहू शकते. तसेच, त्र्यंबकेश्वर मंदिर मंगळवारी भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांनी मंदिरात येणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सप्तशृंगी देवस्थान देखील अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे बंद ठेवण्यात येणार असून, यात्रेकरूंनी प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Ratnagiri News : मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागाचे आव्हान पेलत महावितरणचे यश; प्रभावित गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत

Web Title: Red alert for ratnagiri district tomorrow holiday for all schools and colleges on tuesday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • mansoon
  • Rain Alert
  • School Holiday

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?
2

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
3

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.