Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fishing News: रत्नागिरीतील सागरी मासेमारी संकटाच्या जाळ्यात! पापलेटचे दर्शन दुर्मीळच

हवामान बदलास्सह पर्ससीन, ट्रोलिंग, एलईडी पद्धतीच्या बेसुमार मासेमारीसह समुद्रातील वाढते प्रदूषण व इतर कारणांमुळे मासेमारीचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 10, 2026 | 04:18 PM
Fishing News: रत्नागिरीतील सागरी मासेमारी संकटाच्या जाळ्यात! पापलेटचे दर्शन दुर्मीळच

Fishing News: रत्नागिरीतील सागरी मासेमारी संकटाच्या जाळ्यात! पापलेटचे दर्शन दुर्मीळच

Follow Us
Close
Follow Us:

समुद्रात शेकडो परप्रांतीय नौका
पापलेटचे दर्शन दुर्मीळच झाले
अनेक पुरक उद्योग धोक्यात…

रत्नागिरी: परप्रांतीय अत्याधुनिक मच्छीमार नौकांची घुसखोरी, धोक्याच्या इशाऱ्यामुळे मासेमारी वरचेवर बंद राहू लागली आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या स्थानिक नौकांना मासळी मिळेनासी झाली आहे. महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाला घरघर लागल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत या व्यवसायाचे प्रतिबिंब धूसर होऊ लागले आहे. परकीय चलन मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या सागरी मासेमारीला विविध कारणांमुळे उत्तरती कळा लागली आहे.

हवामान बदलास्सह पर्ससीन, ट्रोलिंग, एलईडी पद्धतीच्या बेसुमार मासेमारीसह समुद्रातील वाढते प्रदूषण व इतर कारणांमुळे मासेमारीचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी. चा सागरी किनारा लाभला असून जिल्ह्यात ३ हजार ३८७ मच्छीमार नौका आहेत, यामध्ये सुमारे ३९० पर्ससीन आणि मिनी पर्ससीननौका आहेत. दरवर्षी १ सप्टेंबर रोजी मासेमारीसाठी पर्ससीननौका समुद्रात जातात. यावर्षी पावसाळा लांबल्याने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्‌यात पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरु झाली. त्यानंतर चक्रीवादळांचा धोका, मतलई वारे आणि समुद्रात उसळणाऱ्या मोठ मोठ्या लाटांमुळे नौका मालकांनी स्वतःहुन मासेमारी बंद ठेवली.

Sindhudurga News: “सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयासाठी…”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

समुद्रात शेकडो परप्रांतीय नौका

गोवा, मलपी, गुजरात, कर्नाटकच्या अनेक अत्याधुनिक नौका जिल्ह्याच्या समुद्रात मासेमारीसाठी घुसखोरी करत आहेत, परप्रांतीय एका नौकेचे क्षमता स्थानिक १० नौकांच्या बरोबरीची असते. शेकडो परप्रांतीय नौका समुद्रातील लहान मोठा मासा खरडवून नेत आहेत. खोल समुद्रात या परप्रांतीय नौका एलईडी मासेमारीसुद्धा करतात. मतलई वाऱ्यांमुळे सध्या पर्ससीन नौकांना मासळी मिळत नाही. या नौका समुद्रातून बंदरात परत येतात. मासळी मिळत नसल्याने पारंपरिक फिशिंग आणि रापण नौका बंद होण्याच्या मार्गावर आहेत, नौकेला मालकांना मासेमारीसाठी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. यामध्ये खलाशी, तांडेल, पागी यांचे जिन्नस, इंधन, पाणी, बर्फ आदी खर्चाचा समावेश आहे. परप्रांतीय नौका एकदा समुद्रात मासेमारीसाठी आल्या की महिनाभर मासेमारी करून बंदरात जातात. त्यामुळे परप्रांतीय अद्यावत एक नौका स्थानिकांच्या १० नौकांचा मासा किंवा मासळी उद्योग हिरावून नेत आहेत.

Nitesh Rane: “राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी…”; मंत्री नितेश राणेंचे निर्देश

अनेक पूरक उद्योग धोक्यात…

जिल्हातील मासेमारीवर बर्फ, टेम्पो, बंदरावरील विचिच दुकाने असे अनेक पुरक उद्योग अवलंबून आहेत, मासेमारीच अडवणीत आली असल्याने पुरक उद्योगही धोक्यात आले आहेत. या सर्व घडामोडीचा परिणाम स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या मासळीच्या दरावरसुद्धा होत आहे, त्यामुळे समुद्र असतानाही येथील खवय्याना चक्रचादराने मासळी विकत घेण्याची वेळ आली असल्याचे अनेक नौका मालकांनी सांगितले.

Web Title: The marine fishing industry in ratnagiri is in crisis fishermen fishery news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Cyber Job Scam Abroad: परदेशातील जादा पगाराच्या नोकरीचे आमिष, सायबर फ्रॉड न केल्यास केले जाते शोषण
1

Cyber Job Scam Abroad: परदेशातील जादा पगाराच्या नोकरीचे आमिष, सायबर फ्रॉड न केल्यास केले जाते शोषण

हभप श्री. चारूदत्तबुवा आफळे उलगडणार ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’; चिपळूणमध्ये 12 जानेवारीपासून…
2

हभप श्री. चारूदत्तबुवा आफळे उलगडणार ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’; चिपळूणमध्ये 12 जानेवारीपासून…

Leopard News: रात्री अन् दिवसा बिबट्याचा खेळ; ‘या’ जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत
3

Leopard News: रात्री अन् दिवसा बिबट्याचा खेळ; ‘या’ जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत

ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन
4

ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.