Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: शिवाईनगर भागातील रहिवाशांना दिलासा, वाढीव पाणी बिलास मिळाली स्थगिती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याशी झालेल्या बैठकीत शिवाईनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिलेल्या दंडात्मक पाणी पट्टीच्या नोटीशीला स्थगिती देण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 21, 2025 | 06:01 PM
शिवाईनगर भागातील रहिवाशांना दिलासा, वाढीव पाणी बिलास मिळाली स्थगिती (फोटो सौजन्य-X)

शिवाईनगर भागातील रहिवाशांना दिलासा, वाढीव पाणी बिलास मिळाली स्थगिती (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : शिवाईनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिलेल्या दंडात्मक पाणी पट्टीच्या नोटीशीला स्थगिती देण्यात आली असून पाणीपट्टीच्या बिलावरील दंड पुर्णतः माफ केला आहे. अशी माहिती ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी दिली. त्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याशी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने बोलत होत्या.

तसेच शिवाई नगर परिसरातील गिरीराज सोसायटी गीतांजली सोसायटी, शिवशक्ती सोसायटी, चिन्मय सोसायटी, प्रगती सोसायटी ,ओम साई श्रद्धा सोसायटी, या म्हाडाच्या सोसायटी बरोबर श्री समर्थ सोसायटी, सहजीवन सोसायटी, , सुनीती सोसायटी ,एकरूप सोसायटी, सोसायटी, नवदुर्गा सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, या सोसायटीतील नागरिकांना म्हाडाच्या तथाकथित अधिकाऱ्यांनी वेटीस धरले असून २०-२२ वर्षांनंतर अचानक दंडात्मक रकमेसह थकीत पाणीपट्टीची नोटीस पाठवणे हे अत्यंत चुकीचे आहे. असे तुघलकी आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे! अशी आग्रही मागणी त्यांनी जैस्वाल यांच्याकडे केली.

मिठी नदी स्वच्छता प्रकल्प घोटाळ्यात ईडीची एंट्री; ६५ कोटींचा गैरव्यवहार उघड

यावर बोलताना म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दंडात्मक पाणीपट्टीच्या नोटीस ला स्थगिती दिली असून पाणीपट्टी वरील दंडात्मक रक्कम पूर्ण माफ करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच या सोसायटी धारकांना मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन द्वारे अथवा ठाणे महापालिकेचे पर्यंत द्वारे पाणीपुरवठा होतो यासंदर्भात सविस्तर अहवाल देण्याची निर्देश ठाणे महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सोसायटी धारकांचे मूळ बिल देखील फेर तपासणी करून टप्प्याटप्प्याने भरण्याची सोय दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या ज्यांच्याकडे केवळ पाणी जोडणी आहे परंतु पाणी येत नाही अशा नागरिकांना दिलेले बिल पूर्ण माफ करण्याचे देखील आश्वासन यावेळी देण्यात आले.

या संदर्भात ठाणे शहरातील शिवाईनगर परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना महापालिका व म्हाडाकडून दुहेरी पाणीबिलांची थकबाकी भरावी लागत असून त्यातून त्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे असे पत्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील नगरसेवकांचे शिष्टमंडळाने म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जैस्वाल यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. निवेदन स्वीकारून सकारात्मक तोडगा काढल्याबद्दल माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल यांचे आभार मानले आहेत. तसेच या संदर्भातील प्रश्न भविष्यात न सुटल्यास आपला लढा यापुढे देखील चालू राहील असे नि: संदिग्ध आश्वासन संबंधित सोसायटीच्या रहिवाशांना दिली आहे. या वेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेविका विमल भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक संजय कदम व शिवाई नगर मधील असंख्य रहिवासी उपस्थित होते.

Pune Rain Update : अवकाळी पावसाने पुणेकरांना झोपडले; 50 हून अधिक झाडपडीच्या घटना तर रस्त्यांच्या झाल्या नद्या

Web Title: Relief to the residents of shivainagar area and increase in water bill has been stayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • pratap sarnaik
  • thane

संबंधित बातम्या

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
1

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
2

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
3

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

Dahi Handi 2025 : मुंबई-ठाण्यातील या भागात सर्वात उंच दहीहंडी, ‘संस्कृती’ देणार 25 लाखांचे ‘लोणी’, कोणत्या गोविंदला मिळणार बक्षीस?
4

Dahi Handi 2025 : मुंबई-ठाण्यातील या भागात सर्वात उंच दहीहंडी, ‘संस्कृती’ देणार 25 लाखांचे ‘लोणी’, कोणत्या गोविंदला मिळणार बक्षीस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.