• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Weather Rain Update Water Pooled On The Road

Pune Rain Update : अवकाळी पावसाने पुणेकरांना झोपडले; 50 हून अधिक झाडपडीच्या घटना तर रस्त्यांच्या झाल्या नद्या

Pune Rain Update : पुण्यामध्ये जोरदार वादळी पाऊस झाला. पहिल्याच पावसामध्ये पुणेकरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शहराला अक्षरशः नदीचे स्वरुप आले होते.

  • By प्रीति माने
Updated On: May 21, 2025 | 03:34 PM
pune weather rain update Water pooled on the road

पुण्यात झालेल्या वादळी पावसामुळे रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : शहरामध्ये देशभरामध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून शहरामध्ये पाऊस पडत आहे. दररोज सायंकाळी पडणाऱ्या या पावसामुळे वातावरणामध्ये मोठे बदल होत आहेत. मात्र काल(दि.20) अवकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे पुणे शहर पूर्णपणे जलमय झाले होते. दोन तास तुफान पाऊस पडल्यानंतर शहरातील रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरुप आले होते.

पुण्यामध्ये दुपारी तीन वाजल्यापासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. पुणे वेधशाळेने हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पुढील सहा दिवस आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली होती. सिंहगड रोड, डेक्कन परिसर, बाणेर रस्ता आणि कात्रज चौकामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वरुन कोसळणारा तुफान पाऊस आणि रस्त्यांवर साचलेले पाणी यामुळे चाकरमान्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जोरदार अवकाळी पावसामुळे शहरामध्ये 50 हून अधिक झाडपडीच्या घटना झाल्या असल्याची माहिती पुणे अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये धानोरी, एरंडवणे, येरवडा, हडपसर, पेठांमधील भाग आणि कोथरुड व कर्वेनगर भागांचा समावेश आहे. झाडप़डीच्या घटनांमध्ये सकाळी 10 पर्यंत 54 घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये  2 ठिकाणी भिंत देखील पडली. धनकवडीमधील तीन हत्ती चौक येथे भिंत पडल्याची घटना घडली. त्याचबरोबर हिंगणे खुर्दमधील अक्षय कॉम्लेक्स येथे देखील भिंत पडल्याची घटना घडली.

54 incidents of tree fall due to unseasonal rains in Pune city

पुणे शहरामध्ये अवकाळी पावसामुळे झाडपडीच्या 54 घटना घडल्या आहे (फोटो – टीम नवराष्ट्र)

धानोरीमध्ये होर्डिंग पडल्याची घटना

पुण्यामध्ये अवकाळी पावसामध्ये होर्डिंग पडल्याची घटना देखील घडली आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील पोरवाल रोड येथे होर्डिंग पडल्याची घटना घडली. मुसळधार पावसामुळे जाहिरातबाजी करणारे लोखंडी होर्डिंग पडले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यांवर पडलेले होर्डिंग बाजूला सारले. रस्त्यांवर पडलेला राडारोडा बाजूल्या केल्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली.

Incident of hoarding falling in Dhanori after heavy rains in Pune

पुण्यामध्ये मुसळधार पावसानंतर धानोरी मध्ये होर्डिंग पडल्याची घटना घडली (फोटो – टीम नवराष्ट्र)

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुण्यामध्ये तुफान वादळी पाऊस पडल्यानंतर पालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छतेचे काम केल्यानंतर देखील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले होते. रस्त्यांना नदीचे स्वरुप मिळाले होते. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. कात्रज चौकामध्ये देखील अशीच जलमय परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये रस्त्यांवरील खड्डे देखील दिसून येत नव्हते. येरवडा आणि कल्याणी नगर भागात रस्त्यावर पाण्याचे डबके साचल्याचे जागोजागी दिसून आले आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वाहनचालक अतिशय धोकादायक पद्धतीने  वाहन चालवत असल्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता होती.  रस्त्यांवर उभी केलेली वाहने देखील पावसाच्या जोरामुळे वाहून गेली. त्यामुळे या वादळी पावसाने पुणेकरांना झोडपले असून यामध्ये अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Pune weather rain update water pooled on the road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
1

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Pune Rain: पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला; जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन 
3

Pune Rain: पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला; जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन 

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?
4

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.