राज्यातील तब्बल 'इतक्या' शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच; वेतनश्रेणी बदलाचा मार्ग मोकळा (File Photo : Teachers)
अमरावती : राज्यातील महाविद्यालयांमधील प्राचार्यांचे निवृत्तीचे वय सध्या ६२ वर्षे आहे. हे वाढवण्याची मागणी अनेक महिन्यांपासून सुरु आहे. असे असताना आता यावरूनच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. राज्यातील महाविद्यालयांमधील प्राचार्यांचे निवृत्तीचे वय ६२ वरून ६५ वर्षे करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
अमरावती येथे आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनच्या ४० व्या राज्य अधिवेशनात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. या अधिवेशनाला राज्यभरातील शेकडो प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहे. यावेळी प्राचार्यांच्या निवृत्ती वयात वाढ, प्राध्यापक भरती, शैक्षणित धोरणातील सुधारणांसह अनेक मुद्यांवर चर्चा झाली.
हेदेखील वाचा : आई अंगणवाडी सेविका: कष्टाने वाढवलेल्या मुलाने क्लिअर केले MPSC, झाला मोठ्ठा साहेब; वाचा प्रेरणादायी गोष्ट
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘वीस वर्षे प्राध्यापकाची भरती झाली नव्हती, ती आमच्या सरकारने केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणांसदर्भात प्राचार्यांनी केलेल्या सूचनांवर शासन विचार करेल. आजच्या काळात केवळ मागण्या मांडून होणार नाही तर काळानुरूप होणाऱ्या बदलांना स्वीकारून आपल्याला पुढे जावे लागेल’.
शासकीय निर्णयांतील उणिवांची सरकारला जाणीव करून दिली
प्रिन्सिपल असोसिएशनचे उपाध्याक्ष प्राचार्य नंदकुमार निकम यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शासकीय निर्णयांतील उणिवांची सरकारला जाणीव करून दिली. प्राध्यापक भरती, शैक्षणिक सुविधा आणि धोरणात्मक निर्णयांमधील अडचणी शासन दूर करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भविष्यातील आराखडा ठरविण्यास मंथन पडेल उपयोगी
दरम्यान, उच्च शिक्षण क्षेत्रात भविष्यात होऊ घातलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर झालेले हे मंथन भविष्यातील आराखडा ठरविण्यास उपयोगी पडेल. त्यादृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
हेदेखील वाचा : उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाबाबत आशा वर्कर्सनी महिलांमध्ये जनजागृती करावी, ठाणे महापालिका आयुक्तांचे निर्देश