शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांचे काम
मुंबई/नीता परबः आदिशक्तीचा जागर सध्या चालू आहे. आपली संस्कृती ही स्त्रीत्वाचा सन्मान करते. अशाच मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या नेतृत्वाची धुरा लिलया पेलणाऱ्या शिक्षणाधिकारी सुजाता खरे. शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी अवघ्या काही महिन्यातच शिक्षण विभागात स्वत:चा ठसा उमटवला आहे. १९९७ साली महानगरपालिकेत शिक्षिका म्हणून सुरुवात केल्यानंतर या शिक्षकवृंदाचा शिक्षक होण्याचा त्यांचा प्रवास आव्हानात्मक हाेता, हा प्रवास यशस्वी करत १८ फेब्रुवारी २०२५ मध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व १ सष्टेबर २०२५ मध्ये प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) असे टप्पे पार केले.
पालिका प्रशासनाच्या अंतर्गत मराठी, गुजराती, इंग्रजी, तमिळ, हिंदी, तेलुगु, उर्दू, कन्नड अशा विविध माध्यमांच्या शाळा कार्यरत आहेत. याशिवाय एसएससी, सीबीएससी, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई अशा राज्य आणि केंद्रीय मंडळाच्या शाळा मुंबई मनपा चालवते. तसेच मनपाच्या १११८ व खाजगी प्राथमिक १०५५ शाळा, लाखो विद्यार्थी व शिक्षकांचे विविध प्रश्न साेडविण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असताे. ज्यामुळे त्यांनी स्वत:चा आगळा-वेगळा ठसा उमटवला आहे आणि उत्तम करिअर घडवले आहे.
विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांची रेलचेल
शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील ही मनपा शाळेत शिकणारी मुलं आज सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. एफएलएन कार्यक्रमांतर्गत गुणवत्ता विकास, गणित गुरुवार सारखे उपक्रम याशिवाय दहावीचा उत्कृष्ट निकाल तसेच दादर वूलन मिल आयसीएसई मंडळ १००% निकाल, पूनम नगर सीबीएसई मंडळ निकाल ८७%, शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी इयत्तेच्या १२३४ आणि आठवी इयत्तेच्या ९७२ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर चमकदार कामगिरी विद्यार्थ्यांनी केली आहे. या उल्लेखनीय कार्यात सुजाता खरे यांचा माेलाचा सहभाग आहे. इयत्ता ६वी ते ८ वी विद्यार्थ्यांसाठी गणितीय क्रिया उपक्रम, इयत्ता ९ वी १० विद्यार्थ्यांसाठी विविध व्यावसायिक शिक्षणाचे कौशल्य केंद्र, शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी एप्रिल मध्येच पाठ्यपुस्तक वाटप, ‘एक पेड माँ के नाम’, असे विविध उपक्रम सध्या त्या सचाेटीने राबवित आहेत.
पुराने सोडले MPSC वर पाणी! राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली, या तारखेला होणार परीक्षा
शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा
बीएमसी शाळा यात २ शाळांची निवड, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा १ व २ एकूण ५ शाळांची निवड झाली ही शिक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे, क्रीडा, सहशालेय उपक्रम अशा सर्वच बाबतीत मुंबई मनपाची मुलं उल्लेखनीय भूमिका वठवत आहेत. दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाला २७ वस्तू, पोषण आहाराची जोड दिल्याने मनपा शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. पालकांच्या विश्वासाला मनपा शिक्षण विभाग पुरेपूर न्याय देत असल्याचे शिक्षणाधिकारी सुजाता खरे अभिमानाने सांगतात.
शिक्षणाचे बाळकडू आई-वडिलांकडून
शाळांना आवर्जून भेट देणे, विद्यार्थ्यांबराेबर संवाद साधत त्यांच्यात रमायला आवडते. शिक्षणाचे हे बाळकडू मला माझ्या आई वडिलांकडून मिळाले आहे. आई गृहिणी आणि वडील सहायक केंद्रीय तपास अधिकारी (वर्ग १) म्हणून निवृत्त. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचारवारसा त्या यथाशक्ती जगत असल्याचे सुजाता खरे सांगतात.
अभ्यासासाेबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे महत्वाचे
येत्या काही महिन्यात पथनाट्य स्पर्धा, बालकोत्सव स्पर्धा पिकनिक (४थी व ७वी विद्यार्थ्यांसाठी) शिष्यवृत्ती परीक्षा, संगीत सप्ताह – संगीत विभाग सेवा सप्ताह, चित्रकला स्पर्धा गडकिल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इंद्रधनुष्य २०२५, छायाचित्रण कार्यशाळा आणि स्पर्धा – कला अकादमी महापौर आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा २०२५ आदी स्पर्धांचे आयाेजन करण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सुजाता खरे सांगतात.
IPS Success Story: सोडली डॉलर्सवाली नोकरी! देशसेवेची वेडापायी पूजा झाली IPS