एमपी सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचे सारंग लखानी यांच्याशी विवाह ठरला आहे (फोटो - सोशल मीडिया)
सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. नागपूरच्या लखानी कुटुंबासोबत सुळे कुटुंबियांची सोयरिक जुळली आहे. यासाठी राजकीय वर्तुळातून देखील प्रयत्न करण्यात आले. रेवती सुळे यांचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार असल्याचे समोर आले आहे. मात्र हे लग्न कधी होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषेदची वाट कठीणच; आकड्यांची करावी लागणार जुळवाजुळव
सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे खेळाडू आहेत. . सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत.
खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना दोन अपत्य आहेत. यामध्ये रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिने प्रतिष्ठित पदवीचे शिक्षण घेतले आहे. प्रतिष्ठित London School of Economics मधून पदवी पूर्ण केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. यानंतर दिल्लीमध्ये देखील अनेकदा रेवती सुळे या दिसून आल्या आहेत. त्यामुळे रेवती सुळे या अनेकदा चर्चेमध्ये आल्या आहेत.
हे देखील वाचा : सांगली जिल्हा परिषदेत भाकरी फिरली तुतारी वाजली; सत्ता ठरणार राजकीय समीकरणावर
अजित पवारांचे निधन
खासदार सुप्रिया सुळे यांचे बंधू आणि रेवती सुळे यांचे मामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. दिवंगत नेते अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे पवार कुटुंबियांमध्ये शोकपूर्ण वातावरण आहे. यामुळे रेवती सुळे यांचा विवाह पुढे जाण्याची शक्यता आहे.






