Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Transport E-Challan: RTO कडून ‘अभय योजना’ प्रस्तावित; वेळेत दंड भरल्यास सवलतीची शक्यता

ई-चलानच्या मुद्द्यावरून राज्यातील परिवहन क्षेत्रात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. बस, ट्रक, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा यांसारख्या विविध परिवहन संघटनांनी ई-चलानमध्ये दिलासा देण्याच्या मागणीसाठी अलीकडे आंदोलन छेडले होते.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 10, 2026 | 01:11 PM
Maharashtra Transport E-Challan: RTO कडून ‘अभय योजना’ प्रस्तावित; वेळेत दंड भरल्यास सवलतीची शक्यता

Maharashtra Transport E-Challan: RTO कडून ‘अभय योजना’ प्रस्तावित; वेळेत दंड भरल्यास सवलतीची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात ई-चलान वाद पुन्हा पेटला
  • ५०% दंड माफीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला
  • ‘अभय योजना’ लागू करण्याचा प्रस्ताव सरकारकडे
 

Maharashtra Transport E-Challan: ई-चलानच्या मुद्द्यावरून राज्यातील परिवहन क्षेत्रात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. बस, ट्रक, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा यांसारख्या विविध परिवहन संघटनांनी ई-चलानमध्ये दिलासा देण्याच्या मागणीसाठी अलीकडे आंदोलन छेडले होते. त्यानंतर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आंदोलन स्थगित करण्यात आले. यानंतर परिवहन विभागाने राज्य सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला असून, त्यात परिवहन वाहनांवर आकारण्यात आलेल्या ई-चलानपैकी ५० टक्के दंड माफ करण्याची तसेच ‘अभय योजना’ लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: ‘अजित पवार यांच्या नावाला विरोध नाही, पण…’; अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या नावावरून हाके आक्रमक

राज्यभरातील वाहनांवर आकारण्यात आलेल्या ई-चलानची एकूण रक्कम २०० कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. संघटनांचे म्हणणे आहे की, चलानांची संख्या आणि रक्कम सतत वाढत आहे, मात्र अनेक ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा आणि प्रक्रिया पूर्ण न करता चलान आकारले जात आहेत. त्यामुळे ई-चलान प्रणालीत सुधारणा करून प्रलंबित चालान १०० टक्के रद्द करण्याची मागणीही संघटनांनी केली आहे. महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीने आरटीओने सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.

राज्य सरकारने हा प्रस्ताव सध्या आरटीओ विभागाकडे परत पाठवला असून संबंधित घटकांशी चर्चा करून सुधारित प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने मात्र या विषयावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, प्रस्तावित ‘अभय योजना’बाबतही परिवहन क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण आहे. या योजनेनुसार एखाद्या वाहनावरील ई-चलान एका महिन्याच्या आत भरल्यास दंडाच्या रकमेवर सवलत देण्याची तरतूद असू शकते. अनेकदा चालान दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने मोठी थकबाकी निर्माण होते. अशा परिस्थितीत वेळेत दंड भरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना आणली जात असल्याचे सांगितले जाते.

हे देखील वाचा: विरारमध्ये उभारणार १०० कोटींचे मँग्रोव्ह पार्क; वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी

परिवहन संघटनांचे म्हणणे आहे की, पार्किंग, लोडिंग-अनलोडिंग आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर ई-चलान जारी करणे योग्य नाही. त्यामुळे येत्या काळात सरकार, आरटीओ आणि परिवहन संघटनांमध्ये होणाऱ्या चर्चेनंतरच या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Web Title: Rto proposes abhay yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • E Challan
  • Pratap Saranaik
  • RTO

संबंधित बातम्या

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक
1

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईकांचा नगररचना विभागाला इशारा
2

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईकांचा नगररचना विभागाला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.