Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Ahir News: ‘मी पक्ष सोडलेला नाही…’ सचिन अहिरांच्या विधानाने राजकीय पेच वाढला; आमदारकी राहणार की जाणार?

Sachin Ahir News: सचिन अहिर हे २०२२ मध्ये धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दिले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 01, 2026 | 12:02 PM
Sachin Ahir, Anti Defection Law

Sachin Ahir, Anti Defection Law

Follow Us
Follow Us:
  • सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज
  • सचिन अहिर यांनी पक्षांतर केल्याने त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई
  • मी पक्ष सोडलेला नाही. तांत्रिक मुद्यावर आपण नंतर वेगळ्या व्यासपीठावर बोलू
 

Sachin Ahir News: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. सचिन अहिर यांचे शिंदे गटात जाणे ही महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड मानली जात आहे. या सगळ्या घडामोडींनंतर ठाकरे गटाकडून सचिन अहिर यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सचिन अहिर यांनी पक्षांतर केल्याने त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी ठाकरेंची शिवसेनेकडून पावले उचलण्यास सुरूवात झाली आहे. पण सचिन अहिर यांच्या एका वक्तव्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी!

काय म्हटलं आहे सचिन अहिर यांनी?

‘लक्षात घ्या, मी पक्ष सोडलेला नाही. तांत्रिक मुद्यावर आपण नंतर वेगळ्या व्यासपीठावर बोलू.’ असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. सचिन अहिर म्हणाले की, ” एकनाथ शिंदे यांनी मला उपसभापती पदाची जबाबदारी दिली. हा माझा बहुमानच आहे. यापदाचा मान ठेवून मी भविष्यात काम करणार आहे, खासगीत लोकप्रतिनिधींना विचाराल तर तेही हेच सांगितील की असा नेता आम्हाला साथ देणार असेल तर काम करता येते. पण काही लोकांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं.”

सचिन अहिर यांच्या विधानावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक तांत्रिक मुद्दा मांडला आहे. ” सचिन अहिर जेव्हा आमदार झाले त्यावेळी आम्ही त्यांना मतदान केलं होतं. ते आमदार झाले त्यावेळी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान हे चिन्ह आमच्याकडे होते. आजही पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडला असे म्हणता येणार नाही. ” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सचिन अहिर यांची आमदारकी जाणार की राहणार? ठाकरे गटाकडून काय कारवाई केली जाणार उचलली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’

सचिन अहिर हे २०२२ मध्ये धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दिले. त्यामुळे अहिर हे तांत्रिकदृष्ट्या मूळ शिवसेनेतच असल्याचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. याच कारणामुळे त्यांच्याविरोधात पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करताना कायदेशीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहिर यांच्या स्पष्टीकरणानंतर आता पक्षांतरबंदी कायद्याच्या चौकटीत पुढे कोणती प्रक्रिया राबवली जाते आणि याबाबत सक्षम प्राधिकरण कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Sachin ahir defection allegations thackeray faction action warning statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Sachin Ahir
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
4

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.