Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : थकीत बिलं, शिक्षकांचा संताप, शाळा बंद आंदोलनाचा इशारा; जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण

शिक्षण संचालक स्तरावर नामंजूर झालेली थकीत बिले तात्काळ मंजूर करावीत, तसेच निष्काळजीपणे बिले नामंजूर करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 07, 2026 | 06:21 PM
Sangali News : थकीत बिलं, शिक्षकांचा संताप, शाळा बंद आंदोलनाचा इशारा; जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण
Follow Us
Follow Us:
  • थकीत बिलं, शिक्षकांचा संताप, शाळा बंद आंदोलनाचा इशारा
  • जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण
सांगली : शिक्षण संचालक स्तरावर नामंजूर झालेली थकीत बिले तात्काळ मंजूर करावीत, तसेच निष्काळजीपणे बिले नामंजूर करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनामुळे शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कोल्हापूर विभागातील मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची थकीत बिले शिक्षण संचालक स्तरावर नामंजूर होऊन दीर्घकाळ प्रलंबित आहेत.

बिले थकल्यामुळे कुटुंबीयांवर वाढता आर्थिक ताण
उपोषणादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या रकमा मिळण्यात होत असलेला विलंब हा त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक ताण आणणारा ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन इंगोले आणि जिल्हा कार्याध्यक्ष बापू दाभाडे यांच्या स्वाक्षऱ्या असून, विविध पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, वरील मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास कोल्हापूर विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे शाळाबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Kolhapur News : चंदगड तालुक्यात काजू उत्पादनात मोठी घटना; अर्थकारण कोलमडल्याने शेतकरी हवालदिल

शिक्षकांच्या आर्थिक हक्कांबाबत अन्याय
संबंधित बिले वेळोवेळी तपासणी करून आवश्यक कागदपत्रे व त्रुटींची पूर्तता करूनही मंजूर करण्यात आलेली नाहीत, ही बाब गंभीर असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. शिक्षकांच्या आर्थिक हक्कांशी संबंधित असलेल्या या बिलांबाबत प्रशासनाकडून होत असलेला विलंब हा अन्यायकारक असून, काही प्रकरणांत जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

गुंजवणीच्या पाण्यासाठी मी किडनी घालवली, पण…; विजय शिवतारेंनी रुग्णालयातून व्यक्त केल्या भावना

Web Title: Sangali news overdue bills anger of teachers warning of school closure symbolic hunger strike in front of the zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sangali News
  • ZP School

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.