बुलढाणा : संजय राऊत हा पिसाळलेला माणूस आहे. एकनाथ शिंदेंना माहीत आहे, त्या बाईला फ्लॅट पाहिजे तिथे म्हणून त्या लोकांनी विरोध केला. हे त्यांना माहीत आहे. परंतु ज्या मुंबईने राजस्थान, गुजराती या सगळ्या लोकांना आपल्या मध्ये सामावून घेतले. ज्या मराठी माणसाने आपलंस केलं, त्या लोकांनी अशा प्रकाराची वागणूक मराठी माणसाला द्यायला नाही पाहिजे आणि मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालून काहीतरी निर्णय घेतील असे संजय गायकवाड म्हणाले.
पुढे ते म्हणाले, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभा सदस्यांचे अनेक प्रकाराचे विदेश दौरे असतात. प्रशासकीय दौरे असतात. काही गोष्टी ज्या आमच्या देशात नाही त्याची माहिती घ्यायची त्याचा अभ्यास करायचा आणि तशा प्रकारच्या काही योजना करायच्या, अशा प्रकाराच्या माहितीसाठी अनेक आमदार जातात. खासदार ही जातात. राऊत ही बर्याच वेळेस गेलेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रशासकीय दौरा आहे. एखाद्या गोष्टी साठी गेले असतील, तर यांच्या पोटात दुखायचं काही कारण नाही अशी टीका संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर केली आहे.
जो तो पक्ष आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून प्रयत्नात असायला पाहिजे आणि तो असतोच आणि प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे हा १४५ चा जादुई आकडा, जो पक्ष गाठेल मग तो आम्ही पण गाठू शकतो. भाजपा प्रयत्न करणार आहे. ज्यांच्याकडे १४५ चा आकडा आहे, तोच मुख्यमंत्री होईल. कोणी किती वल्गना केल्या, हा आमचाच होणार आहे, तोच झाला पाहिजे आहे, आमच्या बोलल्याने काही होणार नाही. त्याला तेवढी डोकी लागतात. ज्याच्याकडे असतील तो रवी राणा कुठल्या आधारावर बोलले माहीत नाही. परंतु शरद पवारांचा इतिहास पाहता, त्यांचा सेक्युलॅरिझम चा माइंड बघता, पवार असा काही निर्णय घेतील असे वाटत नाही. आणि भाजपा सोबत जाणार नाही, असे त्यांच्या मागच्या राजकारणावरुण वाटते.