Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Nirupam : “शिवसेना भक्कम तरच महाराष्ट्रात हिंदू मजबूत…”, संजय निरुपम यांचा निर्वाळा

Sanjay Nirupam News : शिवसेना भाजप युती सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित आहेत. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी महायुतीचे पक्ष निवडणुकीत स्वबळावर लढले,असं मतं संजय निरुपम यांनी व्यक्त केलं.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 03, 2025 | 06:50 PM
"शिवसेना भक्कम तरच महाराष्ट्रात हिंदू मजबूत...", संजय निरुपम यांचा निर्वाळा

"शिवसेना भक्कम तरच महाराष्ट्रात हिंदू मजबूत...", संजय निरुपम यांचा निर्वाळा

Follow Us
Close
Follow Us:
  • शिवसेना भाजप युती फक्त सत्तेसाठी नाही तर विचारधारेवर आधारित
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी विचारांसोबत युती
  • हिंदू आणि हिंदुत्वासाठी आवश्यक आहे
मुंबई : शिवसेना भाजप युती फक्त सत्तेसाठी नाही तर विचारधारेवर आधारित आहेत. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात आहेत. भाजपसोबत युती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी विचारांसोबत युती आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भक्कम असणे हे हिंदू आणि हिंदुत्वासाठी आवश्यक आहे, असा निर्वाळा शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी दिला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Local Body Elections : परभणी जिल्ह्यात ७५ टक्के मतदान; पूर्णा येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने गोंधळ

निरुपम पुढे म्हणाले की, शिवसेना कमकुवत झाली तर उबाठा आणि काँग्रेसला फायदा होईल. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना राज्यात साधुंची हत्या झाली होती. साधु संत सुरक्षित नव्हते त्यांचे झुंडबळी घेतले गेले. उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एकत्र येतात तेव्हा हिंदु समाज आणि हिंदुत्व कमकुवत होते. हिंदू समाज आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात शिवसेना आणि एकनाथ शिंदे मजबूत राहणे आवश्यक आहे, असे मत निरुपम व्यक्त केले. शिवसेना कमकुवत करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे महाराष्ट्रात हिंदुत्व कमजोर करणे, असेही निरुपम म्हणाले.

नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निडणुका मंगळवारी झाल्या. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक होती, युतीची आवश्यकता नाही असे महायुतीतील नेत्यांचे मत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकीत बहुतांश ठिकाणी मित्र पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. यावर महायुती संपली, युती तुटणार, असे फेक नरेटिव्ह विरोधकांनी पसरवले, मात्र महायुती अभेद्य आहे, असे निरुपम म्हणाले. निवडणूक संपली आता महायुती म्हणून सरकार काम करत आहेत, असे ते म्हणाले. शिवसेना पक्ष फुटीचा दावा करणाऱ्या उबाठा खासदार संजय राऊत यांच्याबाबत निरुपम म्हणाले की राऊत आजारी आहेत तरिही खोटं बोलत आहेत. खोटी बातमी पसरवून राज्यात खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न राऊत यांनी आता थांबवावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे निरुपम यांनी सांगितले.

11 वर्षात मुंबईकरांच्या वाहन संख्येत भलीमोठी वाढ! एकूण वाहनांची संख्या 53 लाखांच्या घरात

Web Title: Sanjay nirupam on only if shiv sena is strong will hindus be strong in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sanjay Nirupam
  • shivsena

संबंधित बातम्या

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपला; मनसेचा मोठा पाठिंबा
1

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपला; मनसेचा मोठा पाठिंबा

Amravati News: थातूरमातूर डागडुजी; नांदगाव पेठ आयआरबीचा बोगदा ठरतोय जीवघेणा; उड्डाण पुलाखालील काँक्रिटचा भाग कोसळला
2

Amravati News: थातूरमातूर डागडुजी; नांदगाव पेठ आयआरबीचा बोगदा ठरतोय जीवघेणा; उड्डाण पुलाखालील काँक्रिटचा भाग कोसळला

Nashik News : अबब! वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी! पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या सविस्तर बातमी
3

Nashik News : अबब! वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी! पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या सविस्तर बातमी

एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात घुसून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शाब्दिक हुज्जत, श्रीरंग बरगे यांची चौकशीची मागणी
4

एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात घुसून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शाब्दिक हुज्जत, श्रीरंग बरगे यांची चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.