महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. भगतसिंह कोश्यारींच्या राजिनाम्या नंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातुन विविध प्रतिक्रिया येत आहे. भगतसिंह कोश्यारींनी भाजपाचं एजंट म्हणून काम केलं. ते गृहमंत्रालयाच्या दबावाखाली होते, ते वाईट नव्हते. नवे राज्यपाल बैस आहेत की बायस आहेत. ते माहीत नाही. त्यांनी घटनेला धरुन काम केलं तर स्वागत होईल. अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
[read_also content=”राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा अखेर राजीनामा, राज्याला मिळाले नवे राज्यपाल, ‘या’ 13 राज्यांमध्येही मोठे फेरबदल https://www.navarashtra.com/maharashtra/governor-bhagat-singh-koshyari-finally-resigned-the-state-got-a-new-governor-nrps-369137.html”]
राज्याची मागणी राज्यपाल बदलाची गेल्या काही काळापासूनची आहे. तत्काळ हे बदल होणं गरजेचे होते. मात्र, केंद्राने ते केलं नाही. राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होऊ दिला. केंद्राने सगळ्या नियुक्त्यामबरोबर त्यांची नियुक्ती केली. केंद्राने महाराष्ट्रावर काही उपकार केले नाहीत अशी प्रखर टिका संजय राऊत यांनी केली आहे.तर महाराष्ट्रविरोधी राज्यापालांचा राजिनामा अखेर राजिनामा दिला आहे. अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी दिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. तेव्हापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्याचा रोष पत्करावा लागला होता. तसेच, विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. महाविकास आघाडीने तर राज्यपालांच्या विरोधात मोठा मोर्चाही काढला होता. तसेच राज्यात ठिकठिकाणी राज्यपालांचे पुतळे जाळून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली होती.