Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Farmers News: खांद्यावर पंप, हातात शेतीची धुरा! कराडच्या रणरागिणी महिला गटाची सेंद्रिय शेतीत दमदार वाटचाल

Satara Farmers News: कराड तालुक्यातील शामगावच्या रणरागिणी महिला गटाने सामूहिक सेंद्रिय शेतीचा निर्धार केला आहे. सुषमा पोळ यांच्या नेतृत्वाखाली १६ महिलांनी एकत्र येत १६ एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली असून, राज्यस्तरीय ‘फार्मर कप’ जिंकण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 19, 2026 | 11:55 AM
खांद्यावर पंप, हातात शेतीची धुरा! कराडच्या रणरागिणी महिला गटाची सेंद्रिय शेतीत दमदार वाटचाल

खांद्यावर पंप, हातात शेतीची धुरा! कराडच्या रणरागिणी महिला गटाची सेंद्रिय शेतीत दमदार वाटचाल

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांच्या बरोबरीने महिलांचीही शेतीत भरारी
  • शामगावच्या रणरागिणींचा ‘फार्मर कप’साठी निर्धार
  • १६ महिलांनी १६ एकरात उभारली सेंद्रिय शेती
गजानन गिरी, मसूर : शेतकऱ्यांच्या बरोबरीने आता महिलाही शेती क्षेत्रात पुढाकार घेत आहेत. कराड तालुक्यातील शामगावच्या रणरागिणी महिला गटाने सामूहिक सेंद्रिय शेतीचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र शासन व पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खरीप पीक स्पर्धेत त्यांचा सहभागही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यस्तरीय ‘फार्मर कप’ जिंकण्याच्या जिद्दीने गटाने शेतीतील विविध कामांना जोमात सुरुवात केली आहे.

रणरागिणी महिला गटाच्या अध्यक्षा सुषमा पोळ यांच्या नेतृत्वाखाली १६ महिलांनी एकत्र येत गटशेती सुरू केली आहे. यंदा सुमारे १६ एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यात आले आहे. नियोजनाने महिला स्वतः शेतात उतरल्या आहेत. खांद्यावर पंप घेऊन सोयाबीनवर दशपर्णी अर्काची फवारणी सुरू आहे. पिक सेंद्रिय पद्धतीने घेत असताना उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…

सैदापूर कृषी मंडळामार्फत शेतीशाळांचे आयोजन करून महिलांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी सहाय्यक पी. एम. मोहिते, शंकर जगदाळे, हणमंत चव्हाण, कृषी सखी शिला डांगे, कृषी मित्र धनाजी जाधव यांचा यामध्ये सहभाग आहे. गटातील सदस्यांच्या शेतातील माती परीक्षण करण्यात आले असून, त्यानुसार खत व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येणार आहे.

मजुरी खर्च व वेळेची बचत

या महिला शेतकरी स्वतः कोळपणी करून तण नियंत्रण करीत आहेत. सोयाबीनवरील विविध किडींच्या नियंत्रणासाठी सापळेही लावत आहेत. पेरणीपासून भांगलणी, कोळपणी, कीड नियंत्रण, काढणी व मळणीपर्यंतची कामे सामूहिक पद्धतीने करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. नियोजनाने मजुरी खर्च व वेळेची बचत होऊन उत्पादनवाढीस मदत होणार आहे.

“पेरणीपूर्व मशागत, बीज प्रक्रिया, योग्य पेरणीतील अंतर, तण व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, काढणी-मळणीच्या आधुनिक पद्धती याबाबत शेतीशाळांमधून मार्गदर्शन करण्यात आले आहे. सध्या कोळपणी, फवारणी, किडींसाठी सापळे लावण्याचे काम सुरू आहे.” अशी माहिती सैदापूर मंडळ कृषी सहाय्यक, पी. एम. मोहिते यांनी दिली.

“सामूहिक पद्धतीने केलेली शेती अधिक फायदेशीर ठरते. आम्ही महिला गटशेती करत असून खरीप पीक स्पर्धेत सहभागी झालो आहोत. स्वतः शेतात काम करून सेंद्रिय पद्धतीने सोयाबीनचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. सध्या दशपर्णी अर्काची फवारणी व किड नियंत्रणासाठी सापळे लावण्याचे काम सुरू आहे.” तसेच शिला डांगे, कृषी सखी, कृषी विभाग, पाणी फाउंडेशन व उमेद अंतर्गत रणरागिणी महिला गट, शामगाव दिली.

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल

Web Title: Satara farmers news karad shamgaon ranragini women group organic farming farmer cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Farmers
  • Karad
  • Satara

संबंधित बातम्या

आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…
1

आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…

सातारा पालकमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात; शंभूराज देसाईंची सावध भूमिका
2

सातारा पालकमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात; शंभूराज देसाईंची सावध भूमिका

Satara : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला निर्देश, ठोसेघर-कुसूंबी पर्यटन विकासाचाही आढावा
3

Satara : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला निर्देश, ठोसेघर-कुसूंबी पर्यटन विकासाचाही आढावा

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल
4

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.