Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara: गॅससाठी महिलांची रिकाम्या सिलेंडरसह जिल्हा पुरवठा कार्यालयावर धडक; वितरण व्यवस्थेचा बोजवारा!

साताऱ्यातील कृष्णानगर परिसरात गॅस वितरणाचा प्रश्न गंभीर झाला असून, नागरिकांनी जिल्हा पुरवठा कार्यालयावर आंदोलन केले. म्हावशे गॅस एजन्सीच्या दिरंगाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 13, 2026 | 02:12 PM
Satara: गॅससाठी महिलांची रिकाम्या सिलेंडरसह जिल्हा पुरवठा कार्यालयावर धडक; वितरण व्यवस्थेचा बोजवारा!
Follow Us
Follow Us:

 

  • गॅससाठी महिलांची रिकाम्या सिलेंडरसह जिल्हा पुरवठा कार्यालयावर धडक
  • वितरण व्यवस्थेचा बोजवारा!
सातारा, दि. १३ (प्रतिनिधी) : सातारा शहरातील कृष्णानगर परिसरात गॅस सिलेंडर वितरणाचा प्रश्न तीव्र बनला असून, वेळेवर गॅस न मिळाल्याने नागरिकांनी बुधवारी जिल्हा पुरवठा कार्यालयात धडक देत संताप व्यक्त केला. कृष्णानगर, शाहूपुरी आणि शाहूनगर भागातील महिला व नागरिकांनी रिकामे सिलेंडर घेऊन प्रशासनासमोर आपली व्यथा मांडली. इंडियन गॅसचे अधिकृत वितरक असलेल्या म्हावशे गॅस एजन्सीकडून सातत्याने होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

“गॅस बुकिंग केल्यानंतर अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते. एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी प्रतिसाद मिळत नाही. वारंवार फेऱ्या मारूनही सिलेंडर मिळत नसल्याने घरगुती नियोजन कोलमडले आहे,” अशी तक्रार अनेक नागरिकांनी केली. काही महिलांनी तर “चुली पेटत नसल्याने मुलांच्या जेवणाचीही अडचण निर्माण झाली आहे,” अशी भावना व्यक्त केली.

शासकीय जागेच्या वापरावरून सातारा क्लब वादाच्या भोवऱ्यात, माहिती अधिकारातून उघड झाले प्रश्न; सदस्यांनी चौकशीची केली मागणी

नागरिकांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून पुरवठा विस्कळीत झाला असून, आखाती परिस्थितीनंतर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. मात्र, एजन्सीकडून याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. सिलेंडर उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असताना काही व्यावसायिकांकडे मात्र नियमित पुरवठा सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
यामुळे घरगुती वापरासाठी असलेले सिलेंडर व्यावसायिकांकडे वळवले जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला.

“सामान्य ग्राहक रांगेत उभे राहतात, पण काही ठिकाणी सिलेंडर सहज पोहोचतात. यामागे नेमके काय सुरू आहे, याची चौकशी व्हावी,” अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी संबंधित नागरिकांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी तातडीने विक्री व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले असून, संबंधित एजन्सीच्या वितरण व्यवस्थेची तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले. “अनियमितता आढळल्यास आवश्यक ती कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वाढत्या तक्रारींमुळे शहरातील गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सामान्य नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

साताऱ्यात रंगणार कुस्तीचा महासंग्राम! २२ वर्षांनंतर ‘हिंदकेसरी’चे यजमानपद; विजेत्या मल्लावर होणार बक्षिसांचा वर्षाव

Web Title: Satara krishnanagar lpg gas supply issue protest at supply office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • LPG Gas
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
1

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
2

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
3

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
4

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.