Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jambhulani Post Office: ‘मुक्काम पोस्ट जांभुळणी’ गावाचा ऐतिहासिक क्षण!  मोहिते-पाटलांच्या हस्ते स्वतंत्र पोस्ट ऑफिसचे लोकार्पण

पोस्ट ऑफिस हे नागरिकांच्या आर्थिक बचतीचे आणि सुरक्षित गुंतवणुकीचे केंद्र आहे. मात्र गावातील तरुणांच्या भविष्याचीही गुंतवणूक व्हावी, या उद्देशाने जांभुळणी येथे अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 11, 2026 | 02:49 PM
Jambhulani Post Office Inauguration, MP Dhairyashil Mohite Patil

Jambhulani Post Office Inauguration, MP Dhairyashil Mohite Patil

Follow Us
Follow Us:
  • जांभुळणी गावाला स्वतंत्र पोस्ट ऑफिसची भेट
  • जांभुळणी येथील गजी मंडळाने पोस्ट ऑफिससमोर पारंपरिक गजी नृत्य सादर करून जल्लोष
  • पोस्ट ऑफिस म्हणजे आता फक्त टपाल सेवा नाही, तर तुमची विश्वासार्ह बँक
Jambhulani Post Office: जांभुळणी गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा ऐतिहासिक क्षण शनिवारी अनुभवायला मिळाला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावाला स्वतंत्र पोस्ट ऑफिसची भेट मिळाली आणि “मुक्काम पोस्ट जांभुळणी” अशी नवी अधिकृत ओळख प्राप्त झाली. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण उत्साहात पार पडले. यावेळी कराड डाक विभागाच्या अधीक्षक श्रीमती स्वाती दळवी प्रमुख उपस्थित होत्या.

येथील नवीन पोस्ट ऑफिसच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी, महिला आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सकाळपासूनच गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. जांभुळणी येथील गजी मंडळाने पोस्ट ऑफिससमोर पारंपरिक गजी नृत्य सादर करून जल्लोष साजरा केला. खासदार मोहिते-पाटील यांच्या आगमनावेळी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

Pimpri-Chinchwad News: आकुर्डीत रिक्षात गळफास घेऊन रिक्षाचालकाची आत्महत्या; कारण अद्याप गूढ

प्रास्ताविक करताना सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी सांगितले की, “आजचा दिवस जांभुळणीच्या इतिहासातील अभिमानाचा दिवस आहे. ‘मुक्काम पोस्ट जांभुळणी’ ही केवळ नवीन ओळख नसून गावाच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. यासाठी खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”

ते पुढे म्हणाले की, पोस्ट ऑफिस हे नागरिकांच्या आर्थिक बचतीचे आणि सुरक्षित गुंतवणुकीचे केंद्र आहे. मात्र गावातील तरुणांच्या भविष्याचीही गुंतवणूक व्हावी, या उद्देशाने जांभुळणी येथे अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत खासदार मोहिते-पाटील यांनी जांभुळणीसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा आणि सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

महेश करचे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माढा लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल ९१ नवीन पोस्ट ऑफिस मंजूर झाली असून, हा ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अभिमानास्पद टप्पा आहे.

टीम इंडियात मोठी उलथापालथ? सलग पराभवानंतर प्रशिक्षक देणार राजीनामा? BCCI मोठी कारवाई करणार

“पोस्ट ऑफिस म्हणजे आता फक्त टपाल सेवा नाही, तर तुमची विश्वासार्ह बँक” — खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील

खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील यांनी आपल्या मनोगतात ग्रामस्थांना भावनिक साद घालत सांगितले, “जांभुळणीने जसं माझ्या आजोबांवर प्रेम केलं, माझ्या चुलत्यांवर प्रेम केलं, तसंच प्रेम माझ्यावरही कायम ठेवा. हे प्रेमच मला अधिक काम करण्याची प्रेरणा देतं.”

त्यांनी नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत म्हटले, “पोस्टातील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित आहे. तुमची बचत कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आज पोस्ट ऑफिस ही केवळ टपाल सेवा देणारी संस्था राहिलेली नाही, तर ती सर्वसामान्यांची विश्वासार्ह बँक बनली आहे. येथे बचत योजना, विमा योजना, पेन्शन योजना तसेच विविध आर्थिक सुविधा उपलब्ध आहेत. केंद्र किंवा राज्य सरकारकडून विविध योजनांमधून मिळणारे लाभ तात्काळ खर्च न करता पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवा, बचत करा आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा.”

यावेळी त्यांनी जांभुळणीशी असलेल्या आपल्या कुटुंबाच्या जिव्हाळ्याच्या नात्याचाही उल्लेख केला. “मोहिते-पाटील कुटुंबाचे जांभुळणीशी तीन पिढ्यांचे नाते आहे. सहकारमहर्षी स्व. शंकरराव मोहिते-पाटील, मा. विजयसिंह मोहिते-पाटील आणि मा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही या पवित्र भूमीला वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. आमच्या कुटुंबाची श्री भोजलिंग देवस्थानावर अपार श्रद्धा आहे. अशा जांभुळणीला नवीन पोस्ट ऑफिसची भेट देता आली, याचा मला मनापासून आनंद आहे,” असे ते म्हणाले.

 

Web Title: Satara man taluka jambhulani new post office inauguration mp dhairyashil mohite patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Dhairyashil Patil
  • Satara News

संबंधित बातम्या

Dhairyashil Mohite यांची कथित Audio Clip Viral; धमकीच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
1

Dhairyashil Mohite यांची कथित Audio Clip Viral; धमकीच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Karad Burning Car: कृष्णा पुलावर मध्यरात्री धावत्या कारने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
2

Karad Burning Car: कृष्णा पुलावर मध्यरात्री धावत्या कारने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

मसूर ग्रामपंचायतीची गाळे ताब्यात घेण्याची धडक कारवाई; पोलिसांच्या तत्परतेने तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात
3

मसूर ग्रामपंचायतीची गाळे ताब्यात घेण्याची धडक कारवाई; पोलिसांच्या तत्परतेने तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात

सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
4

सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.