
Satara News, Gas Pipeline Digging Satara,
GATE 2027: गेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, अटी आणि परीक्षा पॅटर्न..
४१ किलोमीटरची खोदाई होणार हे स्पष्ट असताना सुरुवातीलाच संपूर्ण नुकसानभरपाई का वसूल केली नाही, असा खडा सवाल खंदारे यांनी उपस्थित केला. सात कोटींच्या करारनाम्यातील केवळ सुमारे ३ कोटी ५६ लाख रुपये पालिकेकडे जमा झाले असल्याने उर्वरित रकमेचे काय, यावरूनही प्रशासनाला त्यांनी जाब विचारला.
मुख्याधिकारी जळक यांनी मात्र नियम व शासनाच्या निर्देशांनुसारच प्रक्रिया झाल्याचे सांगितले. सुरुवातीला ०.५ मीटर खोदाईची परवानगी होती; प्रत्यक्ष पाहणीत त्यापेक्षा अधिक खोदाई होत असल्याचे दिसल्याने काम थांबविण्यात आले. प्रत्यक्ष खोदाईनुसार नुकसानभरपाई वसूल केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. चौकशीत आपण दोषी आढळल्यास सभेचा निर्णय स्वीकारू, असेही त्यांनी सांगितले.
प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात येताच नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी हस्तक्षेप केला. खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अभियंते आणि मुख्याधिकारी यांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमून संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
गॅस पाईपलाईनचा मुद्दा शांत होत नाही तोच नगरसेवक शंकर माळवदे यांनी प्रशासनाच्या कागदी कारभारावर निशाणा साधला. आवश्यक कागदपत्रे आणि नोटिसा वेळेत उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत त्यांनी विकासकामांमधील तांत्रिक त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले. महादरे तलाव परिसरातील उद्यानासाठी प्रस्तावित जागा, आर्मी वेल्फेअर परिसरातील ओपन स्पेस तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या प्रस्तावित निवासस्थानावरही सभेत जोरदार चर्चा झाली.
Amit Thackeray : ‘अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, तेच काम उत्तम करत आहेत,’ अमित ठाकरे यांची
नगरसेवक निशांत पाटील यांनी मात्र बहुतांश काम पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक मुद्दे उपस्थित करून विकासकामांना अडथळा आणू नये, अशी भूमिका घेतली. विलासपूरमधील विद्युत व्यवस्था आणि व्यापारी परवानग्यांचा मुद्दाही सभेत गाजला.नगरसेवक फिरोज पठाण यांनी आक्रमकपणे मांडणी केली विलासपूरच्या नागरिकांना पथदिव्यान अभावी अंधारात का ठेवता असा सवाल त्यांनी उपस्थित केला .
विषयपत्रिकेवर मोजके विषय; मात्र प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नांचा भडिमार झाला .काही मिनिटात सभा संपेल असे वाटत असताना तब्बल दोन तास सभा वेगवेगळ्या विषयांवर गाजली सभेच्या सुरुवातीला काही दुखावट्याचे ठराव घेण्यात येऊन सहायक मुख्याधिकारी नंदकुमार जाधव यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गॅस पाईपलाईनच्या खोदाईचे आर्थिक गणित आता चौकशी समितीच्या कक्षेत गेल्याने पालिकेच्या तिजोरीचे नुकसान झाले की नाही आणि झाले असेल तर जबाबदार कोण, याचा फैसला अहवालानंतर होणार आहे.