प्रशासनाने दिली माहिती
आयआरबीचे ४५ किलोमीटरचे रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असलेने स्वतंत्र एजन्सीमार्फत हे रस्ते स्वच्छ करता येते का याची पडताळणी करु नवीन स्विपी गमशीन चालविण् यचे स्वतंत्र प्रशिक्षीत ड्रायव्हर घेणे आवश्यक आहे. आहे त्या ड्रायव्हरकडून काम केलेस मशनरी खराब होऊ शकते. महापालिकेला ८ स्विपीग मशीन प्राप्त होत आहेत. सदरची कंपनी महापालिकेच्या चालकाला प्रशिक्षण देणार आहेत. तरीही देखभाल दुरुस्तीच्या ड्रायव्हरसह देखभालीचा प्रस्ताव कंपनीकडून मागणी केलेला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
Kolhapur News : वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला; अवकाळी पावसाने कोल्हापुरकरांची तारांबळ
स्थायी समिती सभेमध्ये विविध विषयांवर झाली चर्चा
सीएसआरच्या माध्यमातून नागरी सुविधा केंद्रात एचडीएफसी बँकेमार्फत मनुष्यबळ नियुक्ती करुन देणेव्या प्रस्तावावर चर्चा होऊन इतर बँकाकडूनाही तसा प्रस्ताव मागवून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अमर समर्थ यांनी नाल्यातील गाळ काढल्यानंतर तो काठावर ठेवल्यानंतर तो उठाव केला जात नाही, गाळ उठाव करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पावसाळा सुरू होण्यासाठी अवघे पंधरा दिवस उरले आहेत. हे काम दोन महिने अगोदर का केले नाही.
असा जाब हे नगरसेवकांनी प्रशासनाला विचारला. त्याला प्रज्ञा उत्तुरे यांनी समर्थन दिले. महापालिकेमार्फत मनुष्यबळाद्वारे व दोन पोकलॅन्ड मशिनमार्फत २० मार्च पासून नाले सफाई सुरु आहे. ४० कर्मचा-यांमार्फत कर्मचा-यांमार्फ लहान मोठे नाल्यांची स्वच्छता सुरु आहे. शहरातील मुख्य रस्त्याचे गटर्स, स्ट्रॉम वॉटर, पेव्हिंग ब्लॉक खराब झाले आहे. काही ठिकाणी गटर्स आहे परंतू पुढे पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. त्यासाठी ज्या त्या विभागाने पाहिले पाहिजे आदी विसयांवर चर्चा झाली.
दुधाळी शूटिंग रेंज येथे रात्री गार्डन नेमावेत
महापालिका विभागीय कार्यालयामार्फत दुधाळी येथे सुरक्षेचे नियोजन करावे. दुधाळी शुटिंग रेंज येथे रेंजचे साहित्य आहे. याठिकाणी रात्रीचे बरेचसे अवैध धंदे सुरु असतात. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र गार्ड नेमावा, अशी मागणी प्रतापसिंह जाधव यांनी केली. यावर गार्ड नेमण्याची व्यवस्था करू, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा परवानगी देतात का?
शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण काढले जाते. त्याठिकाणी परत लावण्यासाठी परवानगी दिली जाते का? असा सवाल अनुराधा खेडकर यांनी विचारला. यावर चारही विभागीय कार्यालयामार्फत स्वतंत्र अतिक्रमणची पथके करण्यात येत आहे. ही पथके सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली त्या त्या विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कारवाई करतील.






