Satara News: मतदार याद्यांमधील बोगस नावांवरून सातऱ्यात काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप
Karad News : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दुबार मतदार नोंदणीच्या प्रकरणावरून काँग्रेसनेही भाजपवर पलटवार करत टीकेची झोड उठवली आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकांचे मतदार यादीत दुबार नाव असल्याचे समोर आणले होते. आता काँग्रेसने दक्षिणच विद्यमान आमदार डॉ. अतुल भोसले यांचे स्वीय सहाय्यक अमोल पाटील यांच्यासह फत्तेसिंह सरनोबत यांच्या नावांची दोन वेगवेगळ्या मतदारसंघात नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
शुक्रवारी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणाले, बोगस मतदान लपवण्यासाठी मोठी नावे घेण्याचा प्रकार भाजपकडून केला जात आहे. ही चोरी लपवण्यासाठी चोराच्याच उलटा बोंबा मारले जात आहेत, असा आरोप केला. यावेळी इंद्रजीत चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर, ओबीसी सेलचे भानुदास माळी, अल्पसंख्याक सेलचे झाकीर पठाण, अजीत पाटील-चिखलीकर आणि रेठरे बुद्रूकचे दिग्विजय पाटील उपस्थित होते.
India Richest CM: आपले मुख्यमंत्री किती “मालदार”? ADR चा अहवाल वाचून येईल भोवळ, म्हणाल पैसाच पैसा…
काँग्रेसचे गजानन आवळकर म्हणाले,”माझे नाव वाठार व कऱ्हाड अशा दोन ठिकाणी होते. मात्र कराडमधील नाव कमी करण्यासाठी मी अर्ज दिला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर सुनावणी झाली; पण हरकत घेणारेच उपस्थित राहिले नाहीत. तरीही नाव कमी झाले नाही, याला प्रशासन जबाबदार आहे.
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये या बनावट नोंदींचा वापर करून मतदान चोरी झाली. चव्हाण कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे कराड दक्षिण, मलकापूर आणि पाटण मतदारसंघात आढळून आली आहेत. या नावांसाठी वेगवेगळे पत्ते, खोटे वय आणि चुकीची माहिती मतदार नोंदणी फॉर्ममध्ये दाखवण्यात आली आहे. अशी टीका उपसरपंच मोहनराज जाधव यांनी केली आहे.
मनोरंजनाचा महासंगम; मधुभाऊंचा खुनी समोर येणार? ठरलं तर मग मालिकेचा महाएपिसोड
पृथ्वीराज चव्हाणांच्या घरात दुबार-तिबार मतदार
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झालेल्या दुबार-तिबार मतदार नोंदणीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे कुटुंबीयच सामील असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील पुरावे सादर करत या निवडणूक फसवणुकीचा भंडाफोड केला. पत्रकार परिषदेत भाजपचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, शहराध्यक्ष सुषमा लोखंडे, माजी नगरसेवक सुहास जगताप, अतुल शिंदे आणि राजेंद्र यादव उपस्थित होते.