रोजच्या आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन केले जाते. फळे प्रामुख्याने पिकल्यानंतर खाल्ली जातात. कारण कच्ची फळे चवीला अतिशय बेचव लागतात. पिकल्यानंतर फळांमध्ये नैसर्गिक गोडवा वाढतो. पण आहारात खाल्ल्या जाणाऱ्या अशा काही भाज्या आणि फळे आहेत जे कच्चे खाल्ल्यानंतर शरीराला खूप जास्त फायदे होतात. याशिवाय तुम्ही कच्च्या भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवू शकता. यामुळे भाज्यांची चव वाढेल आणिशरीराला सुद्धा अनेक फायदे होतील. (फोटो सौजन्य – istock)
'या' कच्च्या भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
जेवणात वापरला जाणारा प्रमुख पदार्थ म्हणजे टोमॅटो. कच्च्या टोमॅटोपासून चटणी किंवा भाजी बनवली जाते. तसेच कच्चा टोमॅटो तुम्ही मीठ लावूनसुद्धा नुसताच खाऊ शकता.
कोकणात प्रामुख्याने बनवली जाणारी पारंपरिक कच्च्या केळ्यांची भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. कच्च्या केळ्यांपासून काप आणि उपवासाचे पदार्थ बनवले जातात.
मे महिन्यात बाजारात सगळीकडे आंबे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ज्या आवडीने आंबा खाल्ला जातो, त्याच आवडीने कच्ची कैरीसुद्धा खाल्ली जाते. कैरीपासून चटकदार चटणी किंवा रायता तुम्ही बनवू शकता.
पपई खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पिकलेल्या पपईमध्ये खूप जास्त फायबर आणि विटामिन सी असते. तसेच कच्चा पपई खाल्यामुळे शरीराला पोषण मिळते.
कच्चा कोबी चायनीज बनवताना वापरला जातो. लहान मुलांना कोबीची भाजी खायला आवडत नाही, पण चायनीजमधील कच्चा कोबी आवडीने खातात.