Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: पोलीस बंदोबस्तात मसूर ग्रामपंचायतीकडून बेकायदेशीर व्यापारी गाळे सील

बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मसूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. अतिरिक्त पोलीस मदत मागवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 10, 2026 | 02:12 PM
Satara News

Satara News

Follow Us
Follow Us:
  • मसूर ग्रामपंचायतीच्या मालकीचे व्यापारी गाळे बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
  • काही व्यक्तींनी शासकीय कामात अडथळा आणण्याचा व कायदा- सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला
  • शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई
Satara News: मसूर ग्रामपंचायतीच्या मालकीचे व्यापारी गाळे बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित गाळे आपल्या ताब्यात घेतले. व गाळे सील केले.

या कारवाईदरम्यान काही व्यक्तींनी शासकीय कामात अडथळा आणण्याचा व कायदा- सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मसूर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणत संपूर्ण कारवाई शांततेत पूर्ण केली. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या मालकीचे व्यापारी गाळे बेकायदेशीरपणे ताब्यात असल्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या कारवाईमुळे ग्रामपंचायतीच्या मालमत्तेवरील अनधिकृत ताब्याविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. शासकीय मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Weather Forecast: IMD चा नवा अंदाज, आठवडाभराच्या धुमाकूळानंतर पाऊस विश्रांती घेणार; ‘या’ तारखेपर्यंत जोर ओसरणार

पोलिसांची तत्परता….. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात

ग्रामपंचायत प्रशासक ए टी बर्गे व ग्रामविकास अधिकारी बालाजी मेढेवार यांनी पंचांच्या उपस्थितीत रीतसर पंचनामा करून संबंधित व्यापारी गाळे ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्याची कारवाई केली. ही कारवाई कायदेशीर व पारदर्शक पध्दतीने पार पाडावी यासाठी ग्रामपंचायतीने पूर्वनियोजन करून मसूर पोलीस ठाण्याकडून सशुल्क पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. कारवाई सुरू असताना काहीनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याचे सांगण्यात आले.

बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मसूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. अतिरिक्त पोलीस मदत मागवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या तत्पर व संयम भूमिकेमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश आले

मोठी बातमी ! तब्बल 1160 कोटींचा इथेनॉल घोटाळा समोर; कुपोषितांच्या 50 लाख क्विंटल तांदळावर डल्ला

मसूरला पणन महामंडळाच्यावतीने बाजारपेठेत तीन गाळे बांधण्यात आले आहेत. सदरचे गाळे शेतकरी व महिला बचत गटांना चालवण्यास दिला जावा असा उद्देश होता. पैकी एक काळा ग्रामसभेच्या परवानगीने बचत गटात चालवण्यास दिला आहे. दुसरे दोन गाळे परवानगी न घेता एका गाळ्याचे दोन भाग करून एकच गाळा बेकायदेशीर दृष्ट्या एका राजकीय पक्षाचे कार्यालय म्हणून वापरात होता. या संदर्भात ग्रामपंचायतीच्या दप्तरी करार दिसून येत नव्हता. सदर गाळा राजकीय दृष्ट्या वापरात होता. याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायतीकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तेव्हापासून गाळे वादग्रस्त व बहुचर्चित ठरले होते. ग्रामस्थांच्यातही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

पदाधिकारी व प्रशासन यांच्यात शाब्दिक वाद

माजी उपसरपंच विजयसिंह जगदाळे, माजी सदस्य महेश घाडगे व महेश जगदाळे यांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद झडले. गाळा खाली करण्याची नोटीस का दिली नाहीॽ गाळा शील करत आहात त्याचे लेखी द्यावे. आम्ही बेकादशीर गाळा घेतला असेल तर तुम्ही भाडे का घेता ॽ आमच्याकडे करार आहेत. आजवर दिलेले भाडे परत द्या. आम्ही गाळा खाली करतो. कोणाच्या दबावाखाली बळाचा वापर करून एक तर्फी कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

Web Title: Satara news masur gram panchayat seizes and seals illegal commercial shops amidst tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • gram panchayat
  • Law And Order
  • Satara News
  • Satara Police

संबंधित बातम्या

जिल्हा अतिवृष्टीच्या संकटात असतानाच सार्वजनिक बांधकाम अधिकारी गेले सहलीवर; नागरिकांमधून संताप
1

जिल्हा अतिवृष्टीच्या संकटात असतानाच सार्वजनिक बांधकाम अधिकारी गेले सहलीवर; नागरिकांमधून संताप

वडूजलाच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं; खटाव-माण तालुका जनसंघर्ष समितीची मागणी
2

वडूजलाच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं; खटाव-माण तालुका जनसंघर्ष समितीची मागणी

शिक्षकांचा एल्गार! न्याय हक्कांसाठी साताऱ्यात हजारोंचा मोर्चा, शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी, शाळा बंद ठेवून आंदोलन
3

शिक्षकांचा एल्गार! न्याय हक्कांसाठी साताऱ्यात हजारोंचा मोर्चा, शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी, शाळा बंद ठेवून आंदोलन

Satara Rain Alert: साताऱ्यात अतिवृष्टीचा हाहा:कार! रस्ते-पूल बंद, NDRF तैनात, तर २७४ नागरिकांना…
4

Satara Rain Alert: साताऱ्यात अतिवृष्टीचा हाहा:कार! रस्ते-पूल बंद, NDRF तैनात, तर २७४ नागरिकांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.