Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : बेकायदा वाहतुकीवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन! स्वराज क्रांती संघटनेचा इशारा

सातारा जिल्ह्यातील वाठार फाटा ते लोणंद मार्गावरील कथित बेकायदा जड वाहन वाहतुकीविरोधात स्वराज्य क्रांती संघटनेने आरटीओकडे कारवाईची मागणी केली आहे. जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश राजाराम सावळे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांना निवेदन सादर करून नियमबाह्य वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढल्याचा आरोप केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 17, 2026 | 08:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

प्रकाश साबळे, सातारा : वाठार फाटा ते लोणंद या महामार्गावर अवैधपणे सुरू असलेल्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला असून संबंधित वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वराज्य क्रांती संघटनेने प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) दिला आहे.

Maharashtra Rain Alert: ये रे ये रे पावसा! हवामानाचा लहरीपणा संपेननाच; ‘या’ जिल्ह्यांना…

स्वराज्य क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश राजाराम सावळे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांना निवेदन देत वाठार फाटा ते लोणंद मार्गावर नियमबाह्य पद्धतीने जड वाहने आणि खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याचा आरोप केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, टोलनाक्यावरील कर वाचविण्यासाठी अनेक जड मालवाहू वाहने या मार्गाचा वापर करीत आहेत. यातील अनेक वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल भरून धावत असून त्यामुळे रस्त्यांवर अपघातांचा धोका वाढला आहे. सातारा-लोणंद महामार्गावरील काम सुरू असल्याने या मार्गावर आधीच वाहतुकीचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत अवजड वाहनांची वाढती वर्दळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

तसेच काही एजंटांच्या माध्यमातून महिन्याच्या ठराविक रकमेच्या व्यवहारातून या वाहनांना अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि विनंती अर्ज करूनही आरटीओ प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

Krishna River: कृष्णा नदीच्या दूषित पाण्याची गंभीर दखल; प्रशासनाचे पथक कवठेत दाखल, नमुने तपासणीसाठी पाठविले

संघटनेने संबंधित वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात या जड वाहनांमुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याबाबत तातडीने पावले उचलली नाहीत तर स्वराज्य क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश सावळे यांनी दिला आहे.

Web Title: Satara news take action against illegal transportation or face intense agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
1

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
2

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
3

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
4

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.