Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : सातारा पालिकेत शिस्तीचा इशारा; शिवेंद्रसिंहराजेंची पदाधिकाऱ्यांना कानउघाडणी, राजकारण पुन्हा तापले

Satara News : सातारा नगरपालिकेतील गदारोळानंतर भाजपमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री Shivendrasinhraje Bhosale यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी पक्षातील शिस्तभंग, गटबाजी आणि वैयक्तिक मतभेदांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2026 | 07:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव करून दिली.
  • नव्या विकास प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत चर्चा होणार
  • सातारा पालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले
Satara News : सातारा नगरपालिकेतील अलीकडील गदारोळ आणि अंतर्गत वादांनंतर भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री Shivendrasinhraje Bhosale यांनी पालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांची तातडीची बैठक घेत पक्षातील शिस्तभंगावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहर विकासाच्या मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करण्याऐवजी वैयक्तिक मतभेद आणि गटबाजी वाढत असल्याने त्यांनी संबंधितांना स्पष्ट शब्दांत सुनावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळामुळे शहरात भाजपच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतः पुढाकार घेतला. “जनतेने आपल्याला विकासकामांसाठी निवडून दिले आहे. सभागृहात आरोप-प्रत्यारोप आणि संघर्ष करण्यासाठी नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव करून दिली.

बैठकीत शहरातील रखडलेली विकासकामे, स्वच्छतेबाबत येणाऱ्या तक्रारी, पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात कोणतीही कुचराई सहन केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. विशेषतः ठेके आणि विकासकामांच्या वाटपावरून निर्माण होणाऱ्या वादांबाबत शिवेंद्रसिंहराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “पालिकेतील सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामांच्या गुणवत्तेशी तडजोड झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, साताऱ्याच्या आगामी विकास आराखड्याबाबत खासदार Udayanraje Bhosale यांच्यासोबत लवकरच समन्वय बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच नव्या विकास प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

Satara News : बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी; वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

पालिकेतील अंतर्गत संघर्षामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात पक्षांतर्गत शिस्त, समन्वय आणि विकासकामांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांच्या कठोर भूमिकेमुळे सातारा पालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, येत्या काही दिवसांत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Satara news warning of strict discipline at satara municipal council shivendrasinharaje reprimands office bearers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 07:21 PM

Topics:  

  • Satara
  • Shivendra Raje Bhosale

संबंधित बातम्या

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक
1

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा
2

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

आशियातील सर्वात मोठ्या वटवृक्षाखाली वटपौर्णिमेचा भक्तिमय सोहळा, कोयना विभागातील ग्रामीण भागात महिलांनी जपली परंपरा
3

आशियातील सर्वात मोठ्या वटवृक्षाखाली वटपौर्णिमेचा भक्तिमय सोहळा, कोयना विभागातील ग्रामीण भागात महिलांनी जपली परंपरा

Wai News: सुरूर-पोलादपूर रस्त्याची दयनीय अवस्था; लोकप्रतिनिधी गप्प, थेट वाहतूक पोलिसानेच हातात फावडे घेऊन बुजवला खड्डा
4

Wai News: सुरूर-पोलादपूर रस्त्याची दयनीय अवस्था; लोकप्रतिनिधी गप्प, थेट वाहतूक पोलिसानेच हातात फावडे घेऊन बुजवला खड्डा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.