Kolhapur News : व्यवसाय परवाना नसलेली दुकाने सील करा; अतिक्रणाविरोधात स्थायी समितीकडे मागणी
स्पर्धेत मुले व मुलींसाठी ९, ११, १३ आणि १५ वर्षांखालील एकेरी गट, १७ व १९ वर्षांखालील एकेरी व दुहेरी गट, पुरुष व महिला खुला गट, मिश्र दुहेरी तसेच ३०+, 35+, ४५+ आणि ५५+ ज्येष्ठ गटांचा समावेश करण्यात आला आहे.नोंदणीची अंतिम तारीख १७ मे असून इच्छुकांनी ९९६०४१९०६९ आणि ८१४९०१४१९१ या क्रमांकांवर संपर्क साधून आपली नोंदणी करावी, असे आवाहन स्पर्धा प्रमुख श्री. वैभव फुले यांनी केले आहे.
वाई जिमखानाचे अध्यक्ष अमर आनंद कोल्हापुरे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार आणि स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची मान्यता मिळाल्यामुळे खेळाडूंचा उत्साह अधिक वाढला असून या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची अधिकृत मान्यता, उत्कृष्ट सुविधा आणि दर्जेदार आयोजनामुळे कै. प्रतापराव (भाऊ) भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२६ ही सातारा जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंसाठी एक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा ठरणार आहे.
Kolhapur News : खरीप हंगामापूर्वीच अडवणूक; खतविक्रेत्यांच्या संपामुळे शेतकरी सापडला कोंडीत






