Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार

Satara News: कृष्णानगर येथील रहिवासी विजय गाडवे हे २६ ऑगस्ट रोजी रात्री फेसबुकवर खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी संबंधित एक रिल पाहत असताना कमेंट सेक्शनमध्ये काहींनी अक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचे निदर्शनास आले.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 28, 2026 | 04:42 PM
Satara News Udayanraje Bhosale Defamation Case

Satara News Udayanraje Bhosale Defamation Case

Follow Us
Follow Us:
  • खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत फेसबुकवर बदनामीकारक कमेंट्स केल्याप्रकरणी तक्रार दाखल.
  • कृष्णानगरचे रहिवासी विजय कृष्णा गाडवे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली लेखी तक्रार.
  • २६ ऑगस्ट रोजी फेसबुक रिलखाली आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा तक्रारीत उल्लेख.
Satara Politics: साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबाबत फेसबुकवर कथितरित्या आक्षेपार्ह व बदनामीकारक कमेंट्स केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा वापर करून एखाद्या सार्वजनिक व्यक्तीची प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

कृष्णानगर येथील रहिवासी विजय कृष्णा गाडवे यांनी ही तक्रार पोलिसांकडे दिली आहे. २६ ऑगस्ट रोजी रात्री फेसबुकवर खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी संबंधित एक रिल पाहताना त्याखालील कमेंट सेक्शनमध्ये काही फेसबुक युजर्सनी कथितरित्या अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Disha Salian case: दिशा सालियन प्रकरणी हायकोर्टात घमासान; राजकीय हेतूचा आरोप अन् नारायण राणेंचा उल्लेख

तक्रारीमध्ये आशीर्वाद चव्हाण, बाळासाहेब नलघे, प्रदीप जगताप, अतुल अजमाने, शांताराम कांबळे, विजय सागर तसेच उल्हास चाळके अथवा तत्सम नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटधारकांचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित कमेंट्सची सत्यता, अकाउंटधारकांची ओळख आणि पोस्टमागील उद्देश यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर मर्यादा ओलांडल्याचा आरोप

खासदार उदयनराजे भोसले यांची सामाजिक व सार्वजनिक प्रतिष्ठा कमी करण्याच्या उद्देशाने या कमेंट्स करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तसेच अशा प्रकारच्या मजकुरामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असले तरी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली आक्षेपार्ह, बदनामीकारक किंवा समाजातील शांतता भंग करणारा मजकूर प्रसारित करण्यास कायद्याची चौकट आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा

संबंधित फेसबुक अकाउंटधारकांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्या पोस्ट व कमेंट्सची डिजिटल तपासणी करावी, तसेच चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विजय गाडवे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून तक्रारीची नोंद, उपलब्ध पुरावे आणि सोशल मीडिया पोस्टची सत्यता तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Satara newspolice complaint filed in satara over objectionable facebook comments against mp udayanraje bhosale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • cyber crime
  • maharashtra
  • Satara
  • Satara Politics
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

Gondiya News: पोषण आहाराच्या तांदळाची विक्री! अर्जुनी-मोरगावात खळबळ; ६ कट्टे व्यापाऱ्याला दिल्याचा आरोप
1

Gondiya News: पोषण आहाराच्या तांदळाची विक्री! अर्जुनी-मोरगावात खळबळ; ६ कट्टे व्यापाऱ्याला दिल्याचा आरोप

Cyber Crime: ऑनलाइन लुटारूंना चाप बसणार! रत्नागिरी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, उदय सामंतांचे निर्देश काय?
2

Cyber Crime: ऑनलाइन लुटारूंना चाप बसणार! रत्नागिरी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, उदय सामंतांचे निर्देश काय?

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील;  जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा
3

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु
4

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.