साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली 'डिजिटल'! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
जयश्री कदम व मोहन कदम हे दोघेही दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात ओळखले जातात. शाळेच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. सदर डिजिटल पॅनेल बोर्ड नवनीत या कंपनीकडून घेण्यात आला. या कामामध्ये ‘ग्लोबल’ शिक्षक बालाजी जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.
गतवर्षी मुलांचा यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धेतील चांगला सहभाग पाहून शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष समाधान पांडुरंग खिलारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये किमतीचे स्पोर्ट किट (खेळाचा गणवेश) दिले. येथील जि. प. शाळेतील मुले ही सतत क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपले नैपुण्य दाखवत आहेत, त्यामुळे गावकऱ्यांनी या कलागुणांना वाव देण्यासाठी ही मदत केली आहे.
तसेच गतवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शेनवडी शाळेतील चार विद्यार्थी पात्र ठरले. बनसोडे सर व हजारे सर हे चांगले काम करत असून शाळेच्या गुणवत्तेचा आलेख उंचावत आहेत, त्याबद्दल गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. शाळेमध्ये योगा, बुद्धिबळ, स्वच्छ व सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा, नियमित शिष्यवृत्तीच्या जादा तासिका, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर आणि मुलांना संगणकाचे ज्ञान या सर्व गोष्टींमुळे ही शाळा नावारूपाला आली आहे.
Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत;
इंटरॲक्टिव्ह इंटेलिजंट पॅनेल व स्पोर्ट किट दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय लक्ष्मण पिसे तसेच केंद्रप्रमुख विनायक काटकर यांनी अभिनंदन केले. बनसोडे सर व हजारे सर यांच्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी कार्यक्रमासाठी माजी कृषी सभापती (जि. प. सातारा) शिवाजीराव शिंदे, माजी सरपंच संजय खिलारी, सुरेश कदम सर, सूरज कदम, ग्रामपंचायत सदस्य नंदा खिलारी, हरीश खिलारी, धनाजी कदम, लीनाताई कदम, मनीषा खिलारी, उपसरपंच यशवंत पारशी, प्रकाश खिलारी, नामदेव शिरतोडे सर, ग्रामसेवक विजय आटपाडकर, विकास खिलारी आदी उपस्थित होते.






