Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Voter List: साताऱ्यात मतदार यादीचा ‘SIR’ धक्का! ३.४२ लाख मतदार संशयाच्या कक्षेत; तर ८८ हजार मृत

Satara Voter List: सातारा जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात ‘SIR’ प्रक्रियेत तब्बल ३ लाख ४२ हजार मतदार संशयाच्या कक्षेत आले आहेत. यामध्ये सुमारे १ लाख ९१ हजार मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचे, तर सुमारे ८८ हजार मतदार मृत असल्याचे समोर आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 31, 2026 | 05:21 PM
निवडणूक आयोगाकडून प्रारूप यादी प्रसिद्ध

निवडणूक आयोगाकडून प्रारूप यादी प्रसिद्ध

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात मतदार यादीचा ‘SIR’ धक्का!
  • ३.४२ लाख मतदार संशयाच्या कक्षेत
  • तर ८८ हजार मृत
सातारा : सातारा जिल्ह्याच्या मतदार यादीत (Satara Voter List) विशेष सखोल पुनरीक्षणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आठही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध होताच तब्बल ३ लाख ४१ हजार ९२५ मतदारांचे गणना प्रपत्रच उपलब्ध झाले नसल्याचे समोर आले. यामध्ये १ लाख ९१ हजार ३८३ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित, तर तब्बल ८८ हजार ४९० मतदार मृत असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मतदार यादीच्या अचूकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या जिल्ह्यात एकूण २६ लाख ५१ हजार ३४७ मतदार आहेत. SIR मोहिमेत प्रशासनाने घरोघरी जाऊन गणना प्रपत्रांचे वाटप, संकलन आणि नोंदींची पडताळणी केली. त्यापैकी २३ लाख ९ हजार ४२२ मतदारांचे म्हणजे ८७.१० टक्के प्रपत्र प्राप्त झाले. मात्र १२.९० टक्के मतदारांच्या नोंदींचे प्रपत्र प्राप्त झाले नाही. अशा मतदारांची नोंद ‘Uncollectable EF’ या प्रवर्गात करण्यात आली आहे.

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर

या प्रवर्गातील आकडेवारीने प्रशासनासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधले आहे. १ लाख ९१ हजार ३८३ मतदार कायमचे स्थलांतरित असल्याचे आढळले आहे. ८८ हजार ४९० मृत मतदार असल्याची नोंद झाली आहे. याशिवाय ३४ हजार ९०५ मतदार अन्यत्र नोंदणीकृत किंवा दुबार असल्याचे आढळले. २६ हजार ३२६ मतदार गृहभेटीत सापडले नाहीत किंवा गैरहजर होते. अन्य कारणांमुळे ८२१ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.

ही नावे थेट वगळली जाणार नाहीत

दरम्यान, या आकडेवारीचा अर्थ संबंधित मतदारांची नावे अंतिम मतदार यादीतून तत्काळ वगळण्यात आली आहेत, असा नाही. ही प्रारूप यादी असून, संबंधित नागरिकांना आपली बाजू मांडण्याची संपूर्ण संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास न ठेवता आपली नोंद तपासावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने Absent, Permanently Shifted, Dead आणि Duplicate/Already Enrolled (ASDD) मतदारांच्या स्वतंत्र याद्याही उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या NIC संकेतस्थळासह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर प्रारूप यादी पाहता येणार आहे. तहसील कार्यालय, मतदार नोंदणी कार्यालय आणि संबंधित BLO यांच्याकडेही यादी उपलब्ध आहे.

नाव गायब? तर ३० सप्टेंबरपूर्वी धाव घ्या!

प्रारूप यादीत नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक ६ भरून मतदार नोंदणी करता येईल. चुकीच्या नोंदीविरोधात प्रपत्र क्रमांक ७, तर नाव, पत्ता किंवा इतर तपशिलातील दुरुस्तीसाठी प्रपत्र क्रमांक ८ भरता येणार आहे.

३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. हे अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या Voters’ Service Portal वरून ऑनलाइनही दाखल करता येणार आहेत.मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे, तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करता येणार आहे.

मतदार यादीतील नाव आहे म्हणून गाफील राहू नका आणि नाव दिसत नाही म्हणूनही शांत बसू नका. SIRनंतरची प्रारूप यादी प्रत्येक नागरिकाने तपासणे गरजेचे असून, नोंद चुकीची असल्यास निर्धारित मुदतीत दावा, हरकत अथवा दुरुस्ती अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Web Title: Satara voter list sir 3 42 lakh voters under scrutiny migrated dead voters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Satara
  • SIR
  • Voter List

संबंधित बातम्या

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
1

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध
2

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

SIR च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता देशातील 17 राज्यांमध्ये…
3

SIR च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता देशातील 17 राज्यांमध्ये…

Voter List 2026 : मतदार यादीत नाव आहे का? 26 ऑक्टोबरपूर्वी हे काम करून घ्या ! राज्यातील मतदारांसाठी चार दिवस विशेष शिबिरं
4

Voter List 2026 : मतदार यादीत नाव आहे का? 26 ऑक्टोबरपूर्वी हे काम करून घ्या ! राज्यातील मतदारांसाठी चार दिवस विशेष शिबिरं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.